राशिद खानचे हे शॉट पाहून सगळेच हैराण

राशिद खानचे हैराण करणारे शॉट्स...

Updated: May 26, 2018, 05:03 PM IST
राशिद खानचे हे शॉट पाहून सगळेच हैराण title=

मुंबई : आयपीएलचा दूसऱ्या क्वालीफायर सामन्यामध्ये हैदराबादने कोलकात्यावर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. कोलकात्याने चांगली गोलंदाजी करत हैदराबादला रन्स करण्यापासून रोखून धरलं होतं. हैदराबाद 150 रन पर्यंत मजल मारेल असं वाटत होतं पण अफगानिस्तानच्या राशिद खाने कमाल केली. त्याने शेवटच्या 10 बॉलमध्ये 34 रन केले. आपल्या गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या राशिद खानने बॅटने देखील या सामन्यात प्रभावित केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये राशिद खानने 24 रन करत कोलकात्यासमोर 174 रन्सचं टार्गेट ठेवलं.

19 वर्षीय अफगानिस्तानच्या या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कोलकात्याच्या 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याची कामगिरी पाहून अनेक जण हैराण झाले. संघाला गरज होती तेव्हा राशिद खानने चांगली बॅटींग आणि बॉलिंग करत संघाला विजय मिळवून दिला. पण त्याच्या एका शॉटची सध्या चर्चा आहे. त्याचा हा शॉट पाहून कमेंटेटर देखील हैराण झाले.

पाहा व्हिडिओ