सेल्फी तो बनता है ! रजत पाटीदारच्या खेळीवर डिव्हिलियर्सने अशी दिली प्रतिक्रिया

एबीडीने या सामन्याबद्दल आणि रजत पाटीदारच्या शानदार खेळीबद्दल ट्विट केले आहे.

Updated: May 26, 2022, 07:27 PM IST
सेल्फी तो बनता है ! रजत पाटीदारच्या खेळीवर डिव्हिलियर्सने अशी दिली प्रतिक्रिया title=

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग 2022 चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल, हे दोन सामन्यांनंतर निश्चित होईल. दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून विजयी संघ २९ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव केला. 

माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनेही या सामन्याचा आनंद लुटला. एबीडीने या सामन्याबद्दल आणि रजत पाटीदारच्या शानदार खेळीबद्दल ट्विट केले आहे.

आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचून गेल्या दोन हंगामात एलिमिनेटरमधून बाहेर आहे. यावेळी विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. एबीडीपूर्वी विराट कोहलीनेही सांगितले की एबीडी पुढच्या वर्षी नक्कीच आरसीबीमध्ये सामील होईल.

आरसीबीच्या या विजयात रजत पाटीदार याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 49 बॉलमध्ये शतक ठोकलं. ज्यामुळे आरसीबीला चांगली धावसंख्या उभारती आली. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ही त्याच्या सोबत सेल्फी काढला. कारण त्यानेच खेळीच अशी खेळली होती.

आरसीबीच्या या विजयाचं श्रेय पाटीदार यालाच अधिक जातं. अनसोल्ड राहिलेल्या या खेळाडूला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचं सोनं करुन दाखवलं. त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतूक होत आहे.