प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून एबीनं तडकाफडकी ही घोषणा केली आहे. एबी आयपीएलच्या ११व्या मोसमात बंगळुरूकडून खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये मात्र एबी खेळणार आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये एबी खेळणार नाही. जिकडून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तिथूनच मी निवृत्तीची घोषणा करत असल्याचं एबी म्हणाला. १४ मोसमांआधी मी युवा खेळाडू म्हणून प्रिटोरियामधूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं आणि आता याच ठिकाणावरून मी संन्यास घेतोय, असं वक्तव्य एबीनं या व्हिडिओमध्ये केलं आहे.
I’ve made a big decision today pic.twitter.com/In0jyquPOK
— AB de Villiers (@ABdeVilliers17) May 23, 2018
भारत आणि ऑस्ट्रेलिया या टीमना टेस्ट सीरिजमध्ये हरवल्यानंतर निवृत्ती घ्यायची हीच योग्य वेळ आहे, अशी प्रतिक्रिया एबीनं दिली. मी आता थकलो आहे. माझा टर्न संपला आहे. हा निर्णय कठीण होता. खूप वेळ मी याबाबत विचार केला त्यानंतर हा निर्णय घेतला. चांगलं क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेणे योग्य आहे, असे डिविलियर्स म्हणाला. मला आतापर्यंत दिलेल्या सहकाऱ्याबद्दल इतर खेळाडू आणि स्टाफचे आभार मानतो. इथेच थांबवण्याची ही योग्य वेळ आहे. मी सर्वांचे आभार मानतो. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील माझ्या क्रिकेट चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आभार. पुढे खेळण्याबाबतचे माझे कोणतेही प्लान्स नाही, असं एबीनं स्पष्ट केलं आहे.
मॅच : ११४
रन : ८७६५
सरासरी : ५४.५१
शतक : २२
मॅच : २२८
रन : ९५५७
सरासरी : ५३.५०
शतक : २५
मॅच : ७८
रन : १६७२
सरासरी : २६.१२
अर्धशतक : २५