'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज

Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला.   

शिवराज यादव | Updated: Apr 9, 2024, 01:28 PM IST
'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज title=

Viral Post: सुट्टी हवी असेल किंवा हाफ डे घ्यायचा असेल तर ऑफिसमध्ये अनेकदा कर्मचारी काहीतरी खोटं कारण सांगतात. खोटी बतावणी करत मित्रांसह पार्टीला जाणं किंवा कुटुंबासह फिरायला जाणं हे प्रत्येकाने कधी ना कधीतरी केलेलं असतं. आपण सांगितलेलं खोटं समोर येऊ नये यासाठीही मग प्रयत्न केले जातात. सोशल मीडियावर पोस्ट न शेअर करणं असे हातकंडे आमजावले जात. पण जर तुम्ही खोटं सांगून गेला असाल आणि थेट टीव्हीवर झळकलात तर....खोटं जर इतकं उघडं पडलं तर काय पंचाईत होऊ शकते हे तुम्हीही समजू शकताच. नुकतंच एका तरुणीसोबत असं घडलं असून, तिने स्वत: सोशल मीडियावर हा किस्सा शेअर केला आहे. 

नेहा द्विवेदी असं या तरुणीचं नाव आहे. बंगळुरु आणि लखनऊत झालेला आयपीएल सामना पाहण्यासाठी ती स्टेडिएममध्ये पोहोचली होती. दरम्यान हा सामा पाहण्यासाठी ती खोटं सांगून ऑफिसमधून लवकर निघाली होती. पण दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या बॉसचा मेसेज आला. 'तू बंगळुरुची चाहती आहेस का?' असं त्यांनी तिला विचारलं. त्यावर तिनेही 'हो, काय झालं?' अशी विचारणा केली. 

त्यानंतर बॉसचं उत्तर आलं की, 'मग तू फार निराश झाली असशील. मी तुला काल मैदानात झेल सोडल्यानंतर नाराज झालेलं पाहिलं. 16.3 ओव्हरला विकेटकिपरने झेल सोडला होता'. त्यावर नेहाने उत्तर दिलं की, 'अनुज रावतने झेल सोडला'.

यानंतर बॉसने तिला सांगितलं की, "मी तुला काही सेकंदासाठी टीव्हीवर पाहिलं आणि ओळखलं. तर यासाठीच तू ऑफिसमधून लवकर निघाली होतीस?". नेहाने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत हा सगळा किस्सा सांगितला आहे. नेहा बॉससह झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. 

नेहाने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "काही नाही मित्रांनो, ऑफिसमध्ये फॅमिली इमर्जन्सी सांगून आयपीएल पाहायला गेली होती. आम्ही टीव्हीवर दिसलो. आता मॅनेजरसह कॉल आहे".

नेहाच्या या पोस्टला 2 लाखापेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. पोस्टवर 4 हजारापेक्षा अधिक लाईक्स आणि कमेंट्स आहेत. वाह मॅनेजर साहेब, तुम्हीदेखील ऑफिसमध्ये आयपीएल पाहत होतात? अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने, वाह काय नशीब आहे असं म्हणत स्माईलिंग इमोजी टाकली आहे.