मुंबई : आयपीएल 11 हंगामासाठी आतापासून उत्साह पाहायला मिळतो आहे. बंदी असलेले चेन्नई आणि राजस्थान संघ पुन्हा येत आहेत. या संघाना त्यांचे किती खेळाडू परत केले जातील याबाबत अजून निर्णय झालेला नाही पण ३ खेळाडू परत केले जातील अशी शक्यता आहे.
आयपीएलच्या या सीजनमध्ये मात्र ५ खेळाडूंची मोठी मागणी असणार आहे. पाहुया कोणते आहेत ते ५ खेळाडू
कृणाल पांड्या, भारत
आयपीएल 2017 मध्ये 240 धावा आणि 10 बळी घेणाऱ्या पांड्या मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावून गेला. पण रिटक करण्याच्या पॉलिसीमुळे पांड्याला परत करावं लागेल त्यामुळे त्यामुळे निलामीमध्ये तो आकर्षणाचा केंद्र असेल.
बेन स्टोक्स, इंग्लंड
गेल्या वर्षी, बेन स्टोक्स पुणे संघाता सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण पुणे संघ आयपीएल 2018 चा भाग नसेल. त्यामुळे बेन स्टोक्ससाठी ही कोण किती पैसे मोजतं हे पाहावं लागेल.
केएल राहुल, भारत
आयपीएल 2018 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. 3 खेळाडू रिटन करण्याच्या पॉलिसी असेल तर बंगळुरुमध्ये २ भारतीयांपैकी कर्णधार विराट आणि चहल असू शकतात. सगळ्या फॉरमॅटमध्ये केएल राहुलने चांगली कामगिरी केली आहे.
मनीष पांडे, भारत
कोलकाता नाइट रायडर्स कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाला दोन भारतीय खेळाडू म्हणून रिटन करतील अशी शक्यता आहे. मनीष पांडे 2018 मध्ये आयपीएल लिलावाचा भाग असू शकतो. त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहता आयपीएलमध्ये त्याच्यावर पैशांचा पाऊस होऊ शकतो
सुरेश रैना, भारत
टी -20 मधील सर्वात शानदार फलंदाज सुरेश रैनाच्या नाव या यादीत पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चेन्नई सुपरकिंग तीन खेळाडूंमध्ये अश्विन आणि धोनीला रिटन घेतील पण मग रैना हा लिलावाचा भाग बनेल. शक्यता आहे की त्याच्यासाठी देखील मोठे पैसे मोजले जाऊ शकतील.