क्रिकेट जगतातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या क्रिकेटपटूने वयाच्या 23 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. ग्लुसेस्टरशायरकडून खेळणारा यष्टिरक्षक फलंदाज बेन वेल्स याने हृदयविकाराच्या गंभीर आजारामुळे व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. प्री-सीझनमध्ये नियमित हृदय तपासणी दरम्यान, वेल्सला एरिथमोजेनिक राइट व्हेंट्रिक्युलर कार्डिओमायोपॅथी (ARVC) असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द अकालीच संपुष्टात आली. काउंटी क्लब ग्लुसेस्टरशायरने बेन वेल्सबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या युवा यष्टिरक्षकासाठी क्लबचे सर्व सदस्य दु:खी असल्याचे क्लबचे म्हणणे आहे.
बेन वेल्सच्या हृदयात लवकरच एक डिफिब्रिलेटर प्रत्यारोपित केले जाईल. याबद्दल या युवा क्रिकेटपटूने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यामुळे उपचार घेऊन त्याचा जीव वाचू शकतो. बेन वेल्सने त्याच्या क्लबने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुर्दैवाने मला व्यावसायिक क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घ्यावी लागेल. येत्या आठवड्यात डिफिब्रिलेटरचे रोपण करणे आवश्यक आहे. ही परिस्थिती कठीण आहे. परंतु कदाचित यामुळे माझे प्राण वाचले. मला आशा आहे की, वेळेनुसार सर्व काही ठीक होईल.
बेन वेल्स म्हणाले की, माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी करार मिळण्यापासून ते वयाच्या 21 व्या वर्षी ग्लुसेस्टरशायरमधून संधी मिळण्यापर्यंत. या कालावधीत, त्याने अनेक मोठ्या दुखापतींशी झुंज दिली आणि त्याच्या पहिल्या आणि एकमेव व्यावसायिक शतकासह कारकिर्दीचा शेवट केला. आता माझ्या शेवटच्या डावात हॅमस्ट्रिंग आहे.
फलंदाज बेन वेल्सने एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे ज्यात त्याने 40 धावा केल्या आहेत. तर 15 लिस्ट ए सामन्यांमध्ये बेनच्या नावावर 339 धावा आहेत ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे. बेनच्या नावावर 9 टी-20 सामन्यांमध्ये 135 धावा आहेत. ज्यामध्ये नाबाद 35 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. बेनने डरहमविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा व्यावसायिक सामना ठरला.