मुंबई : कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल ही काही अशी नावे आहेत जे सध्या क्रिकेटचे स्टार बनले आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या या युवा स्टार्समध्ये आणखी एक नाव येऊ शकतं ज्याने शनिवारी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भारतीय खेळाडुंच्या यादीत आणखी एक स्टार सहभागी झाला आहे.
आयपीएल 2018 च्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच बॉलिंग करणाऱ्या मुंबई इंडियंसच्या या २० वर्षीय स्पिनरने अनेकांचं लक्ष वेधलं. पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी केल्यामुळे आगामी काळात तो आणखी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा वाढली आहे.
मुंबई इंडियंसचा लेग स्पिनर मयंक मार्कंडेय यांने त्याच्या फिरकीच्या जोरावर महत्त्वाचे विकेट घेतले. पहिल्याच सामन्यामध्ये रोहित शर्माने त्याला मैदानात उतरवलं. मयंकने देखील नाराज नाही केलं. चेन्नई सारख्या दिग्गज टीमच्या समोर मयंकने चांगली बॉलिंग करत ४ ओव्हरमध्ये ३ विकेट घेत २३ रन दिले. ओपनर अंबाती रायडू, महेंद्र सिंग धोनी, दीपक चाहरच्या विकेट त्याने घेतल्या.
मयंकटा जन्म 11 नोव्हेंबर 1997 ला पंजाबच्या भटिंडामध्ये झाला. पंजाब अंडर-19, भारतीय अंडर-19 नंतर त्याने आयपीएलमध्ये स्थान मिळवलं. मयंकने याच वर्षी जानेवारीमध्ये पंजाबकडून सैयद मुश्ताक ट्रॉफीमध्ये टी20 डेब्यू केलं होतं. मयंकची बेस प्राइज 20 लाख रुपये होती. मुंबईने पहिला सामना हारला असला तरी या नव्या खेळाडूचा प्रवास आता सुरु झाला आहे.