विराट शुन्यावर बाद, कितव्यांदा बाद झाला शुन्यावर

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या दुसऱया सामन्यात कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.  यापूर्वी आपल्या १८० सामन्यात तो १० वेळा शून्यावर बाद झाला होता. 

Updated: Jun 8, 2017, 05:27 PM IST
 विराट शुन्यावर बाद, कितव्यांदा बाद झाला शुन्यावर  title=

लंडन :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या दुसऱया सामन्यात कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.  यापूर्वी आपल्या १८० सामन्यात तो १० वेळा शून्यावर बाद झाला होता. 

एकूण १७२ इनिंगमध्ये विराट पहिल्यांदाच श्रीलंकेविरूद्ध शुन्यावर बाद झाला आहे. विराटला शून्यावर बाद करण्याचा मान श्रीलंकेचा गोलंदाज प्रदीप याला मिळाला आहे.  

आतापर्यंत विराट कोहलीने वनडे मध्ये २७ शतक आणि ४० अर्धशतक लगावले आहेत. 

गेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये कोलकता नाईट राइडर्स विरूद्ध खेळताना तो शून्यावर बाद झाला आहे. 

टेस्टमध्ये विराटच्या नावावर वेगळा विक्रम 

तब्बल १०४ इनिंगनंतर शुन्यावर बाद झालेला विराट हा पाहिला खेळाडू आहे.