मुंबई : क्रिकेट, फुटबॉल, हॉकीप्रमाणेच लहानांपासून थोरांपर्यंत प्रसिद्ध असलेला आणखी एक खेळप्रकार म्हणजे WWE. जगभरातील स्पोर्ट्स चॅनलचा मोठा हिस्सा WWEने व्यापला आहे. भारतातही WWEची फाईट भलतीच लोकप्रिय आहे. तुम्ही ही फाईट केवळ मनोरंजन म्हणून पाहात असला तरी, ही फाईट करणारे रेसलर्स रग्गड कमाई करतात. जाणून घ्या या कमाईबद्द्ल...
WWE रेसलर्सची कमाई आपल्याकडील बॉलीवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. आपल्याकडे जशी बॉलीवूड सेलिब्रिटींची क्रेझ असते तशी जगभरात WWE रेसलर्सचीही आहे. या प्रसिद्धीच्या जोरावरच त्यांच्या कमाईचे गलेलठ्ठ आकडे फुगत जातात. WWEमध्ये हेवी वेट टायटल जिंकणाऱ्या रेसलर्सला सर्वाधिक पगार असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टॉप टेन रेसलर्सबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या कमाईचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क.
कॉलेजच्या वयापासून रेसलींग क्षेत्रात असलेल्या ब्रोक लेस्नरने कॉलेज संपताच WWEच्या रिंगमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत ब्रोकने ४ वेळा WWEची हेवी वेट चॅम्पीयनशीप जिंकली आहे. ब्रोकची वार्षिक कमाई १२ मिलियन डॉलर इतकी आहे.
WWEमध्ये १५ वेळा विश्वविजेता पद पटकावलेला जॉन सीना वर्षाकाठी ८ मिलियन डॉलर कमावतो. २००५ मध्ये सीना WWEचा प्रमुख चेहरा अशी ओळख बनली होती. तशी आजही ती कायम आहे. जॉन सीनाचे पूर्ण नाव जॉन फेलिक्स एनथॉनी सीना ज्यूनिअर असे आहे.
वास्तव जीवनात पॉल मायकेल असे नाव असलेल्या मात्र WWEमध्ये ट्रिपल एच नावाने प्रसिद्ध असलेला हा पठ्ठा वर्षाकाठी ३.८ मिलियन इतकी कमाई करतो. २७ जुलै १९६९मध्ये जन्मलेल्या ट्रिपल एचने २५ ऑक्टोबर २०१३मध्ये स्टेपी मिकमॅन हिच्यासोबत लग्न केले. स्टेपी मिकमॅन ही WWEचे चेअरमन आणि सीईओ विन्स मिकमॅन यांची मुलगी आहे.
FCW पासून रेसलिंगला सुरूवात केलेल्या रोमन्स रेन्सची कमाई वर्षाकाठी ३.५ मिलियन डॉलर इतकी आहे. रोमन्सने NXTमध्येही चांगले नाव कमावले. त्यानंतर त्याने WWEमध्ये पदार्पण केले. रोमन्स WWEमध्ये ३ वेळा वर्ल्ड हेवी वेट चॅम्पीयन ठरला आहे.
WWEमधील आजघडीचा सर्वाधिक लोकप्रिय चेहरा म्हणून डीन एम्ब्रोजला ओळखले जाते. गेल्या ५ वर्षांपासून डीन एम्ब्रोज WWEमध्ये आहे. प्रचंड लोकप्रियतेमुळे डीन WWEमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० खेळाडूंमध्ये मोडतो. तो वर्षाकाठी २.७ मिलियन कमावतो.
काही काळ WWEमधून बाहेर पडलेल्या या रेसलरर पुनरागमन केले आणि चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. खरेतर सुरूवातीच्या काळात हा रेसलर केवळ रेसलमेनिया खेळण्यासाठी आला होता. मात्र, नंतर विविध रॉमध्ये फाईट केली. त्याची वार्षिक कमाई २.२ मिलियन डॉलर इतकी आहे.
WWEविश्वातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू अशी अंडरटेकरची ओळख आहे. आजही तो WWEमिध्ये कार्यरत आहे. WWEमध्ये अंडरटेकर नावाने वावरणाऱ्या या रेसलरचे खरे नाव मार्क कॅलावे असे आहे. अंडरटेकर WWEमधील पदार्पणापासून आतापर्यंत प्रसिद्धीच्या झोतात आहे.
सेठ रोलिन्सचे खरे नाव कॉल्बी डेनियल लोपेज असे आहे. २८ मे १९८६ ला अमेरिकेत जन्मलेला रेठ रोलिन्स एक प्रोफेशनल रेसलर आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी हा रेसलर २.० मिलियन डॉलर कमावतो.
२००२मध्ये WWEमध्ये आलेल्या रेंडी ओर्टन आपल्या खऱ्या नावानेच रिंगमध्ये खेळतो. आतापर्यंत ४ वेळा हेवी वेट चॅम्पीयनशीप जिंकलेल्या रेंडीने WWEचॅम्पयनशीपही 8 वेळा जिंकली आहे. त्याची वार्षिक कमाई १.९ मिलियन डॉलर्स इतकी आहे.