आता तुमचे पायही सांगणार भविष्य, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवतात अशा व्यक्ती

तुमच्या पायांचा आकार कसा आहे? ज्यावरू कळेल तुमचं भविष्य आणि स्वभाव   

Updated: Mar 29, 2022, 03:59 PM IST
आता तुमचे पायही सांगणार भविष्य, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवतात अशा व्यक्ती title=

मुंबई : समुद्र शास्त्रामध्ये डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाचं महत्त्व सांगितलं आहे. शिवाय प्रत्येक अवयव व्यक्तीचं भविष्य आणि स्वभाव सांगत असतो. आपल्या आयुष्यात काय होणार, दुःख असतील की सुखः.... अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. आपले पाय देखील आपला स्वभाव आणि भविष्य सांगतात...

पायांच्या आकारावरून व्यक्तिमत्व आणि भविष्य कसे जाणून घ्यायचे हे आज आपण जाणून घेवू...
स्क्वेयर फुट - ज्या लोकांची सर्व बोटे समान लांबीची असतात, ते स्वभावाने अतिशय शांत आणि स्थिर असतात. ते प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतात. याशिवाय, ते खूप विश्वासार्ह आहेत.

ग्रीक फुट-  ज्या लोकांच्या अंगठाच्या बाजूचे बोटे लांब आसतील, असे लोक खेळाडू, कलाकार किंवा वक्ते असतात. हे लोक प्रत्येक आव्हानासाठी तयार असतात आणि इतरांवर राज्य करतात.

रोमन फुट- ज्या लोकांचा अंगठा आणि त्यानंतरची 2 बोटे समान लांबीची आणि उरलेली 2 बोटे लहान असतील, असे लोक खूप सामाजिक असतात. त्यांचा कार्यक्षेत्र मोठा असून ते सर्वांचे लक्षपूर्वक ऐकतात.

स्ट्रेच्ड फुट-  ज्यांच्या पायाची बोटे सर्वात मोठी आहेत आणि नंतर उतरत्या क्रमाने बोटे आहेत. अशा व्यक्तींना एकटं राहायला आवडतं. हे लोक आपल्या गोष्टी सहजासहजी कोणाशीही शेअर करत नाहीत.

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)