हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाला विशेष स्थान आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूने पक्षी राजा गरुडला जीवनातील महत्त्वाचे गुण सांगितले आहेत. तसेच एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आपले जीवन सहजतेने कसे जगू शकते हे देखील स्पष्ट केले. असे मानले जाते की, या गोष्टींचे पालन करणार्या व्यक्तीला केवळ आयुष्यातच नाही तर मृत्यूनंतरही आनंद मिळतो. गरुड पुराणात स्नान आणि पूजा या दोन्ही विषयांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जे रोज आंघोळ करत नाहीत ते पापात सहभागी असतात आणि त्यांच्या हयातीतच त्याची शिक्षा होते असे त्यात नमूद केले आहे. चला जाणून घेऊया रोज आंघोळ का महत्त्वाची मानली जाते?
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)