Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ

Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात.

Updated: Nov 27, 2022, 12:53 PM IST
Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ title=

Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात. भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाह दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. शिवलिंगाचा (Shivling) विशेष अभिषेक आणि पूजन केलं जातं. भगवान शंकराचं पंचामृताने रुद्राभिषेक केलं जातं. शिवलिंगावर बेलपत्र, धोतरा आणि पांढरं फुल अर्पण केलं जातं. महाशिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 या वर्षातील 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाईल. 

महाशिवरात्री पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील चतुर्दशीला म्हणजेच 17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी सुरु होईल आणि 18 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी संपेले. महाशिवरात्रीला व्रत करणाऱ्या व्यक्तींनी उपवास 19 फेब्रुवारी सकाळी 6 वाजून 57 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत सोडावा. 

महाशिवरात्रीचं पूजन करून मिळणार इच्छित फळ

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा. दूध, तूप, साखर, मध, दही आणि गंगाजळ अर्पित करावं. केसर मिश्रित जल अर्पण करणं शुभ असतं. शिवलिंगाला चंदनाने तिलक करावा. बेलपत्र, भांग, उसाचा रस, धोतरा, फळ, मिठाई, पान, अत्तर आणि वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर खीर आणि केळ्याचा भोग लावावा. दीपक प्रज्वलित केल्यानंतर अभिषेक करावा. 108 वेळा ओम नम: शिवाय मंत्राचा जाप करावा. 

बातमी वाचा- Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार 'अग्नि पंचक'! चुकूनही या बाबी करू नका

महाशिवरात्रीला पूजा विधी केल्याने संकटं दूर होतात

जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधी कधी जीवन असह्य होऊन जातं. अशावेळी महाशिवरात्रीचं व्रत केल्यास दिलासा मिळतो, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे आणि दुसऱ्या दिवशी गरीबांना अन्नदान करावे. यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख समृद्धी वाढते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)