मुंबई : अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितले जाते. अंकशास्त्र कुंडलीद्वारे तुमचा दिवस, आठवडा, महिना किंवा वर्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी फक्त वाढदिवसाची गरज आहे. जन्मतारीख जोडून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 17 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 1+7=8 असेल. मूलांक 1 ते 9 च्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात (10 ते 16 ऑक्टोबर 2022) स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया.
मूलांक 1: मित्र भेटतील त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. अपूर्ण कामं होतील. सणानिमित्त घरात उत्सव आणि आनंदाचे वातावरण राहील. मणक्याशी संबंधित समस्या त्रास उद्भवू शकतात. अहंकार टाळा.
मूलांक 2: तुम्ही आनंदी रहाल. अडकलेले पैसे परत मिळाल्याने आनंद आणि समाधान मिळेल. लव्ह लाइफमध्ये आनंदी रहाल आणि तुमचे नाते घट्ट होईल. मान आणि खांद्याच्या वेदना होऊ शकतात.
मूलांक 3: काही विशेष बातम्या मिळू शकतात. व्यवसायात एखादी मोठी डील मिळू शकते जी भविष्यात मजबूत नफा देईल. उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल. खोकल्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मूलांक ४: हा आठवडा तुमच्या जीवनात आनंद आणेल. कुटुंबातील सदस्यांची भेट सकारात्मकता देईल. व्यवसायात तुम्ही यश मिळवू शकता. आर्थिक प्रश्न सुटतील. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकतात.
मूलांक 5: सकारात्मक उर्जेच्या जोरावर सर्व कामे होतील आणि अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात कोणत्याही व्यवहारातून फायदा होईल. थायरॉईडची समस्या असू शकते.
मूलांक 6: वैवाहिक जीवन आनंदी असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही सणांचा पुरेपूर आनंद घ्याल. प्रेम वाढेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात लाभ होईल.
मूलांक 7: कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी हा आठवडा चांगला राहील. थांबलेले पैसे तुम्हाला मिळतील. गुडघ्यात वेदना होऊ शकते.
मूलांक 8: अपेक्षेनुसार काम केल्याने तुम्हाला आनंद आणि आराम वाटेल. कामाचे कौतुक होईल. कामाचा ताणही असेल पण काम वेळेवर पूर्ण होईल. कपल आणि विवाहित लोक आनंदी राहतील. अचानक सहलीला जाऊ शकता.
मूलांक 9: अकाली पाहुणे तुमची दिनचर्या विस्कळीत करू शकतात. हा राग तुमच्या जोडीदारावर काढू नका. वाद टाळा. आर्थिक प्रश्न सुटतील. सर्व कामे होतील.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)