Weekly Love Horoscope :'या' राशींचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक आणि रंगीबेरंगी, होळीच्या हा आठवड्याचं राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Love Rashifal 5 March to 12 March 2023 : रंगाच्या उत्सवाने या आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. त्यांचा आयुष्यात रोमान्स आणि आनंदाने भरलेला असणार आहे. इतर राशीची लव्ह लाइफ या आठवड्यात कशी असेल जाणून घ्या.

Updated: Mar 5, 2023, 11:53 PM IST
Weekly Love Horoscope :'या' राशींचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक आणि रंगीबेरंगी, होळीच्या हा आठवड्याचं राशीभविष्य जाणून घ्या title=
Weekly Love Horoscope 5 March to 12 March 2023 weekly love rashifal all zodiac signs holi 2023 week in marathi

Weekly Love Horoscope 5 March to 12 March 2023 in marathi : पोळी रे पोळी पुरणाची पोळी...आठवड्याची सुरुवात होळी म्हणजे होलिका दहनने करणार आहोत. म्हणजेच नकारात्मकचा अंत करणार आहोत. अशात हा आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसे असेल, कोणाच्या प्रेमात अडचणी येतील तर कोणाचं प्रेम बहरणार आहे, ते जाणून घ्या. (Weekly Love Horoscope 5 March to 12 March 2023 weekly love rashifal all zodiac signs holi 2023 week in marathi)

मेष (Aries)

होळीचा हा आठवडा तुमच्या भरपूर प्रेम आणणारा असणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप जर तुम्ही असाल तर ही होळी, होळीचे रंग तुम्हाला जवळ घेऊन येतील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. एखाद्याचं बोलणं किंवा वागणं तुम्हाला आवडणार नाही, ते तुमच्या मनाला लागेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. एकदंरीत हा आठवड्या तुमच्या प्रेमासाठी उत्तम आहे. 

वृषभ (Taurus)

हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. होळी हा आनंदाचा सण आहे तो कुटुंबासोबत साजरा करा. प्रेम जीवनात जोडीदाराचं तुमच्याकडे विशेष लक्ष राहिल. नातेवाईक किंवा शेजारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे. तुमची लव्ह लाइफ आणि वैवाहिक जीवनात रोमान्स असणार आहे. तुमचं प्रेमाचं नातं अजून घट्ट होईल. प्रियकरासोबत आनंद आणि बेस्ट मुमेन्ट शेअर करणार आहात. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांची लव्ह लाइफ ओके ओके असणार आहे. तुमच्या नात्यात प्रेम आणि उत्साह असेल. तुमच्या जोडीदाराकडे या आठवड्यात लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी शेवटी तुमचं नातं मजबूत होईल. जोडीदारासोबत एकांतात किंवा कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आनंददायी आणि लाभदायी असणार आहे. त्यामुळे  लव्ह लाइफ आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह राहणार आहे. होळीच्या दिवशी खाण्यापिण्यावर लक्ष द्या. तणाव घेऊ नका. एखाद्या गोष्टीवर लगेचच प्रतिक्रिया देऊ नका. 

कन्या (Virgo)

ही होळी आणि धुलीवंदन तुम्ही जोडीदारासोबत उत्साहात साजरी करणार आहात. या आठवड्यात तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे आणि रोमांचक क्षण घालवणार आहात. जोडीदाराबरोबर खरेदीचा योग आहे. कुठल्या तरी कारणामुळ जरा तणाव जाणू शकतो. घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

तूळ (Libra)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी होळीच्या विविध रंगाने सजलेला असणार आहे. लव्ह लाइफमध्ये आनंदच आनंद असणार आहे. तुमच्या लव्ह लाइफसंदर्भात आनंदाची बातमी मिळणार आहे. जोडीदाराबरोबर रोमाँटिक डेटवर जाण्याचा प्लॅन करणार आहात. हा आठवडा तुमच्या लव्ह लाइफसाठी रोमान्सने भरलेला असणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ होळीच्या रंगाप्रमाणे आनंदी असणार आहे. सुसंवाद, जास्त जास्त वेळ यामुळे जोडीदारासोबत प्रेम अधिक घट्ट करणारा ठरणार आहे. लव्ह लाइफ या आठवड्यात शिखरावर असणार आहे. प्रेमातील अडथळे दूर होणार आहेत. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या अतिशय शुभ असणार आहे. रोमान्सने भरपूर अशा या आठवड्यात जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालविणार आहात. जोडीदारासोबत विविध रंगांनी तुमचं आयुष्य आनंदमय होणार आहे. दूर राहणारा जोडीदार या आठवड्यात तुम्हाला अचानक भेटणार असल्याने तुमचं लव्ह लाइफ एकदम सॉलिड असणार आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांचा उत्साह या आठवड्यात शिखरावर असणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवणार आहात. कुठे तरी सहलीवर जाण्याचा बेत आखला जाणार आहे. तुमची लव्ह लाइफ या आठवड्यात एकदम जबरदस्त असणार आहे. 

कुंभ (Aquarius)

हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी थोडा गोड आणि थोडा आंबट असणार आहे. नात्यामध्ये गोड आणि थोडे तिखट वादविवाद होती. पण जोडीदाराच्या एका कृत्याने तुम्ही आनंदी व्हाल. सुसंवाद आणि समजूतदारपणा या दोन गोष्टी तुमचं नातं अधिक घट्ट करणार आहे. मात्र प्रेमात अतिउत्साही होऊ नका. 

मीन (Pisces)

होळी आणि रंगांचा हा उत्सव या राशीच्या लव्ह लाइफमध्येही आनंद घेऊन येणार आहे. रोमान्सने भरपूर हा आठवडा असणार आहे. जोडीदारामधील परस्पर प्रेम अधिक मजबूत होणार आहे. पार्टी मूड आणि गिफ्ट, रोमान्स असा हा आठवडा असणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)