Weekly Horoscope 6 to 12 may 2024 in Marathi : अक्षय्य तृतीयेचा हा आठवडा अनेकांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि भाग्यशाली ठरणार आहे. लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग काही राशींसाठी भरघोस आर्थिक फायदा घेऊन आला आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून
या राशीच्या लोकांनी बचतीचे नियोजन करणे हिताचं ठरले. अनावश्यक खर्चामुळे पैशांची कमतरता तुम्हाला भासणार आहे. दुसरीकडे तुम्हाला तणाव जाणवणार आहे. गुंतवणुकासाठी हा आठवडा चांगला नाही. अतिआत्मविश्वास आणि उत्साहामुळे व्यावसायिक चुकीचा निर्णय घेणार आहात. यासोबतच आठवड्याच्या सुरुवातीला प्रवास करु नका. तरुणांना उच्च स्थान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. आठवड्याचे पहिले दोन दिवस मन गोंधळात अस्वस्थ असेल. आरोग्य चांगल असणार आहे.
शुभ दिवस : 6,7,9
या राशीच्या लोकांना वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठांनी बनवलेल्या टीममध्ये राहून काम करावं लागणार आहे. इतर स्त्रोतांतून तुम्हाला नफा मिळणार आहे. व्यवसायासाठी घेतलेले तुमचे निर्णय योग्य ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीची तुलना गेल्या आठवड्याशी केल्या तुम्हाला हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. जोडीदारासोबत प्रेम मजबूत होणार आहे. विद्यार्थींचा आत्मविश्वास वाढणार आहे. काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने गर्भवती महिलांना त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी.
शुभ दिवस : 7,10
या राशीच्या लोकांनी या आठवड्यात मन शांत ठेवून काम करावे. कारण कामाच्या ठिकाणी लोकांशी वाद होऊ शकतात. नवीन नोकरीत रुजू झालेल्यांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांना फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होणार आहे. तरुणांना अध्यात्मिक आणि परदेश प्रवासाची शक्यता दिसून येत आहे. राजकारणाशी संबंधित लोकांच्या मानसन्मानात वाढ होणार आहे. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिवस : 9,10
या आठवड्यात तुम्ही आळशीपणा टाळा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. करिअरमध्ये यशासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूष असणार आहेत. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला असून त्यांना नफा मिळणार आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांचं सर्जनशील, कला, हस्तकला यात मन रमणार आहे. मनोरंजक कामांना तुम्ही प्राधान्य देणार आहात. आरोग्य सामान्य असेल. शेजाऱ्यांशी संबंध चांगेल ठेवा.
शुभ दिवस: 8,10
या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या कामासोबतच लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करणार आहेत. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मालाच्या डिलिव्हरी करताना काळजी घ्याची आहे. कुठलंही सरकारी काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. ऑनलाइन व्यवहार करताना, तपशील दोनदा तपासा आणि नंतर पेमेंट करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. या आठवड्यात तरुणाई त्यांच्या मित्रमंडळीसोबत आउटिंगचे नियोजन करणार आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला वेळ न दिल्याबद्दल वादविवाद होण्याची शक्यता आहे. बीपीच्या रुग्णांनी काळजी घ्या. दैनंदिन दिनचर्याचे काटेकोरपणे पालन करा.
शुभ दिवस: 6,10
या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. व्यापारी वर्ग मोठ्या डीलसाठी केले प्रयत्न यशस्वी होणार आहे. जुने संपर्क पुन्हा जोडा. तरुणांना आज कामाचा ताण जाणवणार आहे. ते त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असणार आहे. जोडीदार आणि कुटुंबासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. या वादामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. वाहनाने प्रवास करताना कागदपत्रे नीट ठेवा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्तदाब आणि डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 6,8,10
तांत्रिक विभागात काम करण्यासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. व्यापारी वर्गाला कर्जसंबंधात सकारात्मक परिणाम मिळणार आहे. तरुण लोक पार्ट्या आणि आऊटिंग कॅन्सल करुन एकटे राहणे तुम्हाला आवडणार आहे. पुस्तक वाचण्यावर भर देणार आहेत. आर्थिक बाबतीत हा आठवडा चढ उताराचा असणार आहे. कुटुंब आणि मुलांसोबत जास्त जास्त आनंदायी वेळ व्यतित करणार आहात. दम्याच्या रुग्णांना काळजी घेण्याची गरज आहे.
शुभ दिवस: 9,10
या राशीच्या लोकांना आज नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती तसंच वेतनवाढ बाबत चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. व्यापारी वर्गाने काळजीपूर्वक विचार करूनच करार करावेत. व्यापारी लोकांनी या आठवड्यात संयम बाळगावा. तरुणांचं जोडीदाराशी चांगले संबंध होणार आहे. जोडीदाराचे करिअरही चांगले असणार आहे. तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या मुलाच्या करियर किंवा सवयींमुळे तुम्हाला त्रास होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिवस: 6,7,9
या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत सामंजस्याने काम करण्यावर भर द्यावे अन्यथा ते अडचणीत येऊ शकता. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. या लोकांसाठी नफा आणि तोटा हा समान असणार आहे. ऑनलाइन करताना काळजीपूर्वक करा. तरुणांनी आरोग्याकडे लक्ष द्या. मुलांशी संबंधित तुमची धावपळ होणार आहे. आरोग्यासाठी हा आठवडा सामान्य असणार आहे.
शुभ दिवस: 6,9
या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी तांत्रिक कामात व्यस्त असणार आहेत. जी लोक डेटा मॅनेजमेंटचं काम करतात त्यांना कामात लक्ष द्यावे. तर व्यापाऱ्यांना वेळेवेळी स्टॉकची जुळवा जुळव करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी मिळणार आहे. घरगुती वस्तू खरेदीवर पैसे खर्च होणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा खर्चिक असणार आहे. या आठवड्यात तुमचा भावा बहिणीशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
शुभ दिवस: 6, 8,10
या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण असणआर आहे. तुम्हाला कामासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळं आठवड्याच्या शेवटी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. व्यवसायिकांनी वेळोवेळी व्यवस्थापनाची पाहणी करत राहावी. तरुण मंडळी विकेंडला बाहेर जाण्याचा बेत आखणार आहेत. जोडप्यांमध्ये प्रेम वाढणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. पाय दुखीचा त्रास सहन करावा लागणार आहे. कॅल्शियम आणि लोहयुक्त आहारावर भर द्या.
शुभ दिवस: 6,7,8,10
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना या आठवड्यात वरिष्ठांच्या संपर्कात राहावं लागणार आहे. त्यांच्या सल्ल्याुनसार काम करणे फायदेशीर ठरणार आहे. कामासाठी तुम्हाला इतर ठिकाणी जावं लागू शकतं. उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. आर्थिकदृष्टा चांगला असणार आहे. नातंसंबंधासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदाराला नवीन गुंतवणूक करु नका देऊ. आरोग्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.
शुभ दिवस: 6,7,10
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)