Black Thread : 'या' राशींनी अजिबात वापरू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

Wearing black thread rules : काळा धागा ( Black Thread ) हा आपल्या संस्कृतीतील अनेक विधींपैकी एक आहे. असा समज आहे की, काळा धागा पायामध्ये परिधान केल्यानंतर तो वाईट नजरेपासून बचाव करतो. असं म्हणतात की, काही राशींच्या व्यक्तींनी हातात किंवा पायात हा काळा धागा वापरू नये. 

Updated: Jul 12, 2023, 07:48 PM IST
Black Thread : 'या' राशींनी अजिबात वापरू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान title=

Wearing black thread rules : आजकाल अनेक मुली पायामध्ये काळा धागा ( Black Thread ) घालतात. काहीजणांना यामागील शास्त्र माहिती असतं, तर काही लोकं फॅशन म्हणून देखील हा धागा वापरताना दिसतात. काळा धागा ( Black Thread ) हा आपल्या संस्कृतीतील अनेक विधींपैकी एक आहे. असा समज आहे की, काळा धागा पायामध्ये परिधान केल्यानंतर तो वाईट नजरेपासून बचाव करतो.

कशासाठी परिधान केला जातो काळा धागा?

असं मानलं जातं की, हा धागा आपल्या शरीराला नकारात्मक ऊर्जांपासून ( Negative energy ) वाचवतो. हात, पाय किंवा गळ्यात काळा धागा ( Black Thread ) लोक त्यांच्या संरक्षणासाठी वापरतात.

मात्र ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशीच्या लोकांना काळा धागा ( Black Thread ) न घालण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हणतात की, काही राशींच्या व्यक्तींनी हातात किंवा पायात हा काळा धागा वापरू नये. जर या राशीच्या लोकांना काळा धागा ( Black Thread ) घातला तर ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. 

या राशीच्या व्यक्तींना वापरू नये काळा धागा

धनु रास

धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे. याचा ज्याचा रंग पिवळा आहे. त्यामुळे धनू राशीच्या व्यक्तींना काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. याशिवाय काळ्या रंगाचे कपडे देखील या राशीच्या व्यक्तींना वापरू नये. या राशीच्या लोकांनी पिवळा धागा आणि पिवळे कपडे शक्यतो वापरावेत. 

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून त्याचा रंग पांढरा आहे. या राशीच्या व्यक्तींना काळ्या धाग्याऐवजी पांढरा धागा वापरावा. काळा धाग्याचा वापर केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी येण्याच्या शक्यता असतात. याशिवाय अशा व्यक्तींचं लग्न देखील उशीर होतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना काळा धागा वापरू नये. 

मेष रास

मेष राशीचा स्वामी मंगळ असून त्याचा रंग लाल आहे. मेष राशीच्या लोकांना काळ्या धाग्याऐवजी लाल धागा घालण्याचा सल्ला देण्यात येतो. जर तुमची रास मेष असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )