Wedding dates In 2024 : सध्या 2023 चं अखेरचा महिना सुरु आहे. जर तुमच्याही घरात लगीनघाई (Vivah Muhurat 2024) असेल तर आता एकच मुहुर्त राहिलाय तो म्हणजे 15 डिसेंबरचा... त्यानंतर खरमास सुरू होत असल्याने 16 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. जेव्हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतो तेव्हापासून खरमास सुरु होतो. हा खरमास 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपेल. त्यानंतर लग्नाचे एकूण 61 विवाहाचे मुहुर्त आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये एकूण 61 दिवस लग्न आणि इतर शुभ कार्य केले जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र हे ग्रह मजबूत स्थितीत असतील तर लवकर विवाह होण्याची शक्यता असते. शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे मे आणि जूनमध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्याचबरोबर चातुर्मासामुळे 16 जुलै ते 12 नोव्हेंबरपर्यंत विवाह असणार नाही. त्यामुळे तुमच्या घरात लगीनघाई असेल तर तुम्ही खालील तारखांचा विचार ज्योतिषांना विचारून करू शकता.
पाहा संपूर्ण मुहूर्तपत्रिका
जानेवारी – 2, 3, 4, 5, 6, 8, 17, 22, 27, 28, 30, 31.
फेब्रुवारी – 1, 4, 6, 12, 13, 14, 17, 18, 26, 27, 28, 29.
मार्च – 3, 4, 6, 11, 16, 17, 26, 27, 30.
एप्रिल – 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22, 23.
जुलै – 9, 11, 12, 13, 14, 15.
नोव्हेंबर – 17, 23, 26, 27.
डिसेंबर 2024 – 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 26.
खरमास महिन्यात काही राशींवर याचा शुभ परिणाम दिसून येऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळेल. तर मिथुन राशींच्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम दिसून येईल. तर कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल. धनू राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख प्राप्त होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)