Venus Transit: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' 3 राशींची होणार भरभराट

वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे, ज्यावेळी एखादा ग्रह त्याची राशी बदलतो त्यावेळी अशुभ योग तयार होतात.

Updated: Nov 13, 2022, 11:06 PM IST
Venus Transit: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' 3 राशींची होणार भरभराट title=

Venus Transit: वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे, ज्यावेळी एखादा ग्रह त्याची राशी बदलतो त्यावेळी अशुभ योग तयार होतात. मात्र यावेळी काही शुभ योग देखील तयार होतात. दरम्यान शुक्र ग्रहाने 11 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. दरम्यान यामुळे 4 राशीच्या लोकांना फायदा होणार. तर काही राशींना धन तसंच प्रगतीचे योग बनणार आहेत. याशिवाय शुक्र ग्रह स्वतःच्या वृषभ राशीवरून सकारात्मक संकेत देतायत. 

वृषभ 

शुक्राचं संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी पार्श्व योग तुटलेला असणार आहे. त्याचप्रमाणे या काळात आरोग्य सुधारणार आहे. शिवाय व्यवसायात चांगलाच नफा मिळू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहणार आहेत. 

कर्क

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगला सिद्ध होणार आहे. कारण तुमच्या राशीनुसार शुक्र हा लाभाचा स्वामी आहे. यावेळी पॉपर्टी आणि गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेणं फायदेशीर ठरेल. हॉटेल, टूर ट्रॅव्हल्स शिवाय कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ चांगला असू शकतो. 

सिंह

शुक्र राशी बदलताच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. शुक्र ग्रह हा या राशीच्या चौथ्या घराचा स्वामी असणार आहे. त्यामुळे, ज्यांना नोकरी नाही त्यांना नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये चांगले पैसे कमवू शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)