Vasu Baras 2023 : गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
हा सण समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा भक्त गोवत्स द्वादशीच्या दिवशी 'सात्विक' कामं करतात किंवा उपवास करतात आणि या दिवशी ध्रुव नक्षत्राची प्रार्थना करतात तर त्यांच्या पापांपासून मुक्ती होते. या दिवशी गायीची पूजा करणाऱ्या भक्तांना शांती, आनंद आणि निरोगी आयुष्य लाभते. आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, विविध हिंदू देवता आणि देवी विविध प्राण्यांच्या रूपात अवतरले आहेत. म्हणूनच आपण सर्व प्राण्यांमध्ये गाईला सर्वात पवित्र मानतो. वसुबारसला कामधेनूला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते. या दिवशी गाईंचे पूजन केल्यानंतर गाईला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या नेवेद्यामागेही एक विशेष कारण आहे.
वसुबारस या दिवशी एक विशेष नैवेद्य बनवला जातो, जो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. या नैवेद्यामध्ये गाईला भाजी-भाकरी आणि गोडाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचा असतो. या नैवेद्यामध्ये भाजी-भाकरी आणि गोडाचे पदार्थ असतात. यामध्ये गवारीची भाजी, भाकरी आणि गुळाचा समावेश असतो. या पदार्थांमागेही एक कारण आहे.
दिवाळीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो आणि या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण अनेक पदार्थांचे सेवन करायचे असते.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. ते हिमोग्लोबिन पातळी चांगली ठेवण्यासाठी मद्दत करते आणि बाजरीची भाकरी देखील असंच काम करते. ही भाकरी शरीरात उष्णता रोखते. तर गवारीची भाजी खाण्यामागचे असे कारण आहे की त्यात प्रोटीन,फायबर, व्हिटामिन, फॉसफरस, कॅल्शिअम, आयर्न असे अनेक घटक असतात, यामुळेही भाजी हिवाळ्यात शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. आणि म्हणूनच आपणयाचे नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून खातो.