Som Pradosh Vrat 2023 : आजचा दिवस अनेक योगांनी जुळून आला आहे. आज सोमवारी म्हणजे भगवान शंकराची आराधना करण्याचा दिवस...शिवाय आज वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत...हे व्रत सोमवारी आल्यामुळे याला सोम प्रदोष व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केलं जाते. वैवाहिक जीवनात सुख, शांती, संतती आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी सोम प्रदोष व्रत केलं जाते.
पंचांगानुसार, वैशाख कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 17 एप्रिल 2023 ला दुपारी 03:46 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 18 एप्रिल 2023 म्हणजे मंगळवारी दुपारी 01:27 वाजता संपणार आहे. आज संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
आज सायंकाळी 06.48 ते रात्री 09.01 पर्यंत शिवपूजेचा अतिशय शुभ मुहूर्त आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की जो प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होती. आज पूजा करताना भोलेनाथाचा जलाभिषेक नक्की करा तो अतिशय शुभ मानला जातो.
आज सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ योग तयार झाला आहे. ब्रह्म आणि इंद्र आल्यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. हा योग दुपारी 12.13 ते रात्री 09.07 पर्यंत असणार आहे. यावेळ केलेल्या कामात यश मिळणार आहे. शिवाय रात्री 09.07 ते दुसऱ्या दिवशी 18 एप्रिलला सकाळी 06.10 पर्यंत इंद्र योग राहील.
पंचांगानुसार यावेळी वैशाख सोम प्रदोष व्रतातही पंचकची सावली राहणार आहे. पंचक 15 एप्रिल 2023ला संध्याकाळी 06.44 वाजता सुरु झालं आहे. तर 19 एप्रिल 2023ला रात्री 11.53 वाजता संपणार आहे. ज्योतिषशास्त्रात पंचक हे अशुभ मानलं जातं.
शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र, अक्षत, दिवा, धूप, गंगेचे पाणी, फुलं, मिठाई इत्यादींनी विधीपूर्वक पूजा करा.
शिवलिंगाची पूजा केल्यानंतर दिवसभर उपवास ठेवा. या दिवशी दान केल्यास पुण्य लाभते.
'ओम नम: शिवाय' जप करा. रुद्राक्षाच्या जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करु शकता.
सूर्यास्ताच्या तीन तास आधी महादेवाची पूजा करा.
शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करून सर्व पूजेचे साहित्य अर्पण करा.
पूजेनंतर शिव चालिसा पाठ करा आणि शिव मंत्रांचा जप करा.
यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडा.