घराच्या 'या' भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी आपल्यासाठी अशुभ ठरते.

Updated: May 5, 2022, 05:40 PM IST
घराच्या 'या' भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं title=

मुंबई : तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात लावले जाते आणि हिंदू धर्मात तुळशीची पूजा खूप महत्वाची मानली जाते. असे मानले जाते की, तुळशीमध्ये भगवान विष्णू वास करतात. ज्यामुळे लोक दररोज तुळशीची पूज करतात. असं म्हटलं जातं की, असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रत्येक व्रत आणि धार्मिक विधीमध्ये तिची पाने वापरली जातात यावरून तुळशीच्या रोपाचे महत्त्व किती आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

परंतु तुम्हाला माहितीय का, की  तुळशीचे रोप घरी ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी आपल्यासाठी अशुभ ठरते.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरात तुळशीचे रोप कोणत्या ठिकाणी ठेवू नये. ज्यामुळे तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल.

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप चुकूनही गच्चीवर ठेवू नये. विशेषत: ज्या लोकांचा बुध ग्रह पैशाशी संबंधित आहे, त्यांनी याची विशेष काळजी घ्यावी. तसेचत टेरेसवर किंवा गच्चीवर तुळशीचे रोप ठेवल्याने आर्थिक नुकसान होते. तसेच प्राकृत दोष प्राप्त होतो आणि त्यामुळे कर्जाची समस्या निर्माण होते.

तसेच तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला ठेवू नका. यासाठी उत्तर ते ईशान्येकडील स्थान हे शुभ स्थान मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुळशीचे रोप पश्चिम दिशेलाही ठेवू शकता.

तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष अधिक होतात. त्यामुळे चुकूनही ही हे रोप  इथे ठेवू नका.

लक्षात ठेवा की, तुळशीच्या रोपावर पक्षी किंवा कबुतरांनी घरटे बांधू नयेत, हे घरातील केतू अशुभ होण्याचे लक्षण आहे.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)