Tulsi Puja Tips: या दोन दिवशी तुळशीला हात लावणं ठरतं अशुभ? जाणून घ्या काय आहे नियम

Tulsi Niyam:  शास्त्रात सांगितलं आहे की, तुळशीच्या रोपाची पूजा करताना नियमांची काळजी घेतली नाही तर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घराबाहेर पडते. 

Updated: Sep 11, 2022, 11:36 AM IST
Tulsi Puja Tips: या दोन दिवशी तुळशीला हात लावणं ठरतं अशुभ? जाणून घ्या काय आहे नियम title=
tulsi do not touch tulsi on sunday and puja tips

Tulsi Niyam: हिंदू धर्मात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असतं. त्याशिवाय हिंदू धर्मात अनेक झाडं आणि वनस्पतीलाही खास महत्त्व आहे कारण यामध्ये देवदेवतांचा वास असतो, असं म्हणतात. आपण भारतात अगदी सगळ्यांच्या घरात तुळशीचं रोप पाहतो. कारण भारतीय संस्कृतीत तुळशीला पूजनीय स्थान आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते असे म्हणतात. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात सुख-समृद्धी नांदते. पण तुळशीच्या रोपाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुळशीच्या रोपाची पूजा कधी करावी आणि कधी करू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. इतकंच नाही तर शास्त्रात तुळशीच्या रोपाला कुठल्या दिवशी स्पर्श करु नये, शिवाय तुळशीचं पानं कुठल्या दिवशी तोडू नये याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (tulsi do not touch tulsi on sunday and puja tips)

तुळशीला स्पर्श करु नका अन्यथा...

शास्त्रात सांगितलं आहे की, तुळशीच्या रोपाची पूजा करताना नियमांची काळजी घेतली नाही तर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घराबाहेर पडते. शास्त्रानुसार रात्री किंवा सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. रात्री तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्यास धनहानी होते. याशिवाय रात्री तुळशीला पाणी कधीही अर्पण करू नये.

या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नका

रविवारीही तुळशीच्या रोपाला हात लावू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. इतकंच नाही तर या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालण्यासही मनाई आहे. रविवारी तुळशीमातेचं व्रत असतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी देण्यास मनाई आहे. या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत या दिवशी त्यांना स्पर्श करून पाणी दिल्याने त्यांचा उपवास मोडतो आणि लक्ष्मीचा कोप होतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)