Trigrahi Yog: 30 वर्षानंतर शनी, सूर्य, शुक्र यांच्यामुळे बनला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा

Sun Shani and Shukra Grah Yuti: 7 मार्च रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी शनी आणि सूर्य देव आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 13, 2024, 05:55 PM IST
Trigrahi Yog: 30 वर्षानंतर शनी, सूर्य, शुक्र यांच्यामुळे बनला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा title=

Sun Shani and Shukra Grah Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह एका राशीत येऊन राजयोग तयार करतात. असाच एक राजयोग येत्या काळात तयार होणार आहे.

7 मार्च रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी शनी आणि सूर्य देव आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

शनी, शुक्र आणि सूर्य देवाचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. ज्यांचं लग्न झाले आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac)

त्रिग्रही योग तयार झाल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता.  यावेळी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकतं. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल.

मिथुन रास (Mithun Zodiac)

त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. तुम्ही नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित सर्व कामे सहज पूर्ण होतील. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आर्थिक लाभासोबतच व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याने इतरांना प्रभावित कराल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )