Shani Mangal Yuti: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती होते. असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, ग्रहांचा सेनापती, ठराविक कालावधीनंतर राशिचक्र बदलतो. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो.
15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे. यावेळी काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. शनी आणि मंगळाचा संयोग सुमारे 30 वर्षांनी होतोय. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या युतीचा फायदा होणार आहे.
मेष राशीमध्ये मंगळ आणि शनीचा संयोग अकराव्या भावात होणार आहे. यावेळी भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच व्यवसायातही असेच परिणाम दिसून येतील. अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची आशा आहे.
या राशीमध्ये मंगळ आणि शनीचा संयोग तिसऱ्या घरात होतोय. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतील. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. गुंतवणूक भविष्यात निश्चितच अनेक पटींनी अधिक नफा देणारी असेल.
या राशीच्या चढत्या घरात दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा देऊ शकता. तुमची संपत्ती वाढू शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )