Panchang, 17 February 2023 : आज शुक्रवार. आणखी एका आठवड्याचा शेवट समोर उभा ठाकला आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्यात ठरकल्याप्रमाणं अनेकांनीच आपल्या आखणीतील कामं मार्गी लावली. काही शुभकार्य आणि महत्त्वाचं कामं मात्र सुट्ट्यांसाठी राखून ठेवण्यात आली. अशाच कामांसाठी मुहूर्त शोधताय? शुभकार्यासाठी शुभवेळा माहिती नाहीयेत? हरकत नाही. पाहून घ्या आजचं पंचांग. इथं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहे. सोबतच दिवसातील काही महत्त्वाचे मुहूर्तही कळणार आहेत. चला तर मग पाहुयात आजचं पंचांग... (todays Panchang 17 February 2023 Friday )
आजचा वार - शुक्रवार
तिथी- द्वादशी
नक्षत्र - पूर्वाषाढा
योग - सिद्वि
करण- कौलव, तैतुल
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:58 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.12 वाजता
चंद्रोदय - सायंकाळी 05.30 वाजता
चंद्रास्त - रात्री 02.45 वाजता
चंद्र रास- शिशिर
दुष्टमुहूर्त– 09:13:09 पासुन 09:58:06 पर्यंत, 12:57:52 पासुन 13:42:49 पर्यंत
कुलिक– 09:13:09 पासुन 09:58:06 पर्यंत
कंटक– 13:42:49 पासुन 14:27:45 पर्यंत
राहु काळ– 15:12:42 पासुन 15:57:39 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 16:42:04 पासुन 17:26:54 पर्यंत
यमघण्ट– 16:42:35 पासुन 17:27:32 पर्यंत
यमगण्ड– 15:23:56 पासुन 16:48:12 पर्यंत
गुलिक काळ– 08:22:36 पासुन 09:46:52 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:12:56 पासुन 12:57:52 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:28 ते 03:13 पर्यंत
अमृत काळ - सायंकाळी 04:09 ते दुपारी 05.35 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति
चंद्रबल- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)