Panchang, 20 january 2023 : नवं वर्ष सुरु होऊन 20 दिवस कधी उलटले याचा कुणाचा अंदाजही आला नाही. आज आणखी एका आठवड्याची अखेर समोर उभी ठाकली आहे. थोडक्यात आज शुक्रवार. अनेकांनाच सुट्टीचे वेध लागले आहेत, तर काही मंडळी मात्र त्यांच्या दैनंदिन कामातून काहीशी उसंत मिळतेय का यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत.
आजच्या दिवशी काहीजणांच्या घरी काही शुभकार्यही करण्याचे बेत आखले जातील. तुम्हीही अशा शुभकार्याची आखणी करताय का? त्याआधी जाणून घ्या आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि अशुभ काळ. कारण, या वेळासुद्धा तुमच्या आयुष्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या थेट परिणाम करताना दिसतात. अर्थात ही गोष्ट प्रत्येकाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून आहे. तला तर मग, पंचांगानुसार जाणून घेऊया आजचे शुभ मुहूर्त आणि अशुभ काळ.... (todays Panchang 20 january 2023 friday shubh mahurat)
आजचा वार - शुक्रवार
तिथी- त्रयोदशी 10.02 पर्यंत
नक्षत्र - मूळ
योग - व्याघ्यात
करण- वाणिज 10.02 पर्यंत, विष्टी 20.13 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:14 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17.50 वाजता
चंद्रोदय - दुपारी 13:51 वाजता
चंद्रास्त - 16.00 वाजता
चंद्र रास- धनु
दुष्टमुहूर्त– 09:21:28 पासुन 10:03:52 पर्यंत, 12:53:25 पासुन 13:35:48 पर्यंत
कुलिक– 09:21:28 पासुन 10:03:52 पर्यंत
कंटक– 13:35:48 पासुन 14:18:11 पर्यंत
राहु काळ– 11:12 पासुन 12:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम– 15:00 पासुन 15:42 पर्यंत
गुलिक काळ– 08:33:47 पासुन 09:53:16 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:16 ते दुपारी 12:59 पर्यंत
अमृत काळ - सकाळी 9.54 ते सकाळी 11.16 पर्यंत
लाभ मुहूर्त - सकाळी 8.32 ते सकाळी 9.54
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)