आजचे राशीभविष्य | गुरुवार | १९ सप्टेंबर २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Updated: Sep 19, 2019, 08:25 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | १९ सप्टेंबर २०१९ title=

मेष - मित्र आणि भावडांची मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. विचार केलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. तुमचा दिवस कुटुंब, खासगी जीवन आणि पैशांच्या बाबतीत खर्च होईल. महत्त्वाच्या कामांची योजना आखू शकता. तुमच्या जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

वृषभ - नकारात्मक गोष्टींमध्ये अडकाल तर महत्त्वाची संधी गमावण्याची शक्यता आहे. आज कोणताही निर्णय घेऊ नका. दिवसभर सावध राहा. विचार करुन बोला. दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. तब्येत ठिक राहील.

मिथुन - व्यवसायासंबंधी नवीन डील समोर येऊ शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन ऑफर मिळू शकते. विचार केलेली कामं पूर्ण करा, तुमची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दररोजची कामं पूर्ण होतील. पुढे जाल. महत्त्वाच्या मिटिंग करण्यासाठी दिवस शुभ आहे. समस्या संपू शकतात.

कर्क - प्रेमप्रकरणात गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करु नका. नोकरी, व्यवसायातही हलगर्जीपणा करु नका. विचार केलेली कामं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. कोणत्याही कामात आज अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह - काही ना काही विचार मनात येत राहतील. पैसे सांभाळून ठेवा. गुंतवणूक करताना विचार करुनच करा. मनात काहीतरी चिंता राहील. कटू बोलू नका. कोणताही प्लान आज करु नका. जुनी कामं पूर्ण करा. सांभाळून राहा. कामात मन न लागल्याने समस्या वाढू शकतात. तब्येतीच्या बाबतीत दिवस चांगला आहे.

कन्या - व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरु होऊ शकते. जोडीदाराची मदत मिळेल. प्रेमप्रकरणासाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. एखादी नवी कल्पना येऊ शकते. तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या. मन प्रसन्न राहील. तब्येत चांगली राहील. 

तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत तुमची कामं पूर्ण होऊ शकतात. कामात मन लागेल. काही चांगल्या संधी मिळू शकतात. त्याचा फायदा घ्या. अचानक मनात काही विचार येऊ शकतात, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. जोडीदारासोबत अनुकूलता राहील. तब्येत चांगली राहील.

वृश्चिक - नोकरी-व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होऊ शकते. गोंधळ वाढू शकतो. एखादे नुकसान होऊ शकते, त्यासाठी तयार राहा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाटू शकते. समस्या असल्यास सावधरित्या सोडवा. त्रासदायक लोक आजूबाजूलाच असतील. तब्येतीत चढ-उतार राहू शकतो.

धनु - आर्थिक समस्या सुटण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन सुखकारक राहील. दररोजच्या कामातून धनलाभ होऊ शकतो. मोठ्या समस्या सुटू शकतात. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. नोकरी-व्यवसायातील समस्या सुटू शकतात. 

मकर - दिवसभर सावध राहावे लागेल. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्या समस्या वाढवू शकतात. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. काही खास कामं आज अपूर्ण राहतील. कामात मन लागणार नाही. व्यवसायात नवीन व्यवहार करु नका. तब्येत ठिक राहील. 

कुंभ - ऑफिसमध्ये स्वत:ला नियंत्रणात ठेवा. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या संपू शकतात. तुमच्या योजना सफल होतील. पुढील योजना आखू शकतात. रखडलेली कामं पूर्ण करु शकता. तब्येतीच्या बाबतील सांभाळून राहा.

मीन - व्यवसायात काही नवं करण्याच्या नादात समस्या वाढू शकतात. मनात सतत सुरु असलेल्या विचारांमुळे कामात मन लागणार नाही. नोकरी-व्यवसायात घाई करु नका. कोणत्याही कामाचा निर्णय न झाल्यास टेन्शन घेऊ नका. जेवण वेळेत करा. तब्येतीची काळजी घ्या.