राशीभविष्य 8 जानेवारी : 'या' राशींच्या लोकांना स्वतःची काळजी घ्यायला हवी

असा असेल आजचा दिवस 

Updated: Jan 8, 2020, 07:59 AM IST
राशीभविष्य 8 जानेवारी : 'या' राशींच्या लोकांना स्वतःची काळजी घ्यायला हवी  title=

मुंबई : अनेकदा नक्षत्र बदलत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असते. अनेकदा भविष्य आपल्याला सावध करत असतं. असंच आजचं भविष्य असणार आहे. ज्यामुळे तुमचा आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. 

मेष- आज कामाशी संबंधीत जबाबदारी वाढणार आहे. दिवसपूर्ण कामात जाणार आहे. व्यवसायासंबंधी अनेक निर्णय तुम्हाला अतिशय सावधपणे घ्यायला हवे. अनेक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. प्रवास करण्याचा योग आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 

वृषभ - जुने प्रश्न आज सुटतील. स्वतःकडे आज विशेष लक्ष द्या. नवीन खरेदीचा योग आहे. कामात अधिक बिझी असाल. समाज आणि परिवारासोबत वेळ घालवण्याचा आज योग आहे. यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. 

मिथुन - धन लाभ होऊ शकतो. अशा कामातून फायदा होईल जे खूप काळापर्यंत टिकून राहू शकतं. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. भावनाप्रधान विचार न करता बुद्धीप्रधान विचार करायला हवा. मित्र-परिवारासोबत वेळ घालवाल. आज आनंदवार्ता कानी पडेल. 

कर्क - अचानक धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. पैशाच्याबाबतीत सगळे प्रश्न सुटतील. कामात अनेक वेगवेगळे पर्याय वापरून तुम्ही व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. कुशलता आणि सहनशक्ती हाच आजचा मंत्र आहे. 

सिंह - आर्थिक स्थिती आज बदल होण्याचा योग आहे. महत्वकांक्षी असणं अत्यंत गरजेचं आहे. अपेक्षा उंचावतील. त्यामुळे कामाकडे लक्ष द्या. आज उत्तम मेजवानीचा बेत होऊ शकतो. त्यामुळे मन प्रसन्न राहिल. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असे. समजुतदारपणा दाखवा. 

कन्या - ऑफिस किंवा व्यवसायात काही गोष्टी विसरायचा दिवस आहे. नवीन प्रयोग यशस्वी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जोडीदाराच्या शोधात असाल तर आज महत्वाचे निर्णय घेऊ शकता. कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल. 

तूळ - ठरवलेली सगळी जुनी कामं आज पूर्ण होतील. आजचा दिवस खूप खास असेल. सामुहिक आणि सामाजिक कामात आज सहभाग घ्या. यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. आरोग्य सुधारेल. 

वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. अशा काही गोष्टी समोर येतील ज्या आगामी काळात महत्वाच्या ठरणार आहेत. समजूतदारपणाचा वापर करा. पत्नीला वेळ द्या अन्यथा रुसव्याला सामोरं जावं लागेल. आरोग्य थोडं त्रासदायक असेल. 

धनू - आजचा दिवस धनू राशीच्या लोकांसाठी थोडा कष्टाचा असेल. नोकरी, व्यवसाय अन्यथा घरगुती कामांमध्ये देखील थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कारण भविष्य सुधारण्यासाठी आजच मेहनत करावी लागणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. महत्वाचं म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी काढा? ही गोष्ट अधिक ऊर्जा देणारी ठरेल. 

मकर - काही महत्वाची काम आज योजली असतील तर ती नक्की करा. जमिन अथवा प्रॉपर्टी खरेदीचा विचार मनात येईल यामध्ये गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही. अविवाहितांसाठी आजचा दिवस खास असेल. दुसऱ्यांच्या पुढे जाण्याची इच्छा आज डोकं वर करेल. 

कुंभ - आज धैर्याने काम करा. दिवसभार पैशांचाच विचार मनात असेल. पण आज हा विचार थोडा बाजूला सारून कुटुंबाचा विचार करा. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवाल. मनस्थिती बदला म्हणजे तुमची परिस्थिती देखील बदलेल. 

मीन - मीन राशीच्या लोकांकरता आजचा दिवस खास आहे. ठरवलेल्या सगळ्या गोष्टी न चुकता करा. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलणारच आहे. महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. शारिरीक स्वास्थ जपण्यासाठी थोडा आराम महत्वाचा असेल.