राशीभविष्य ७ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रेमात यश

काय म्हणतेय तुमची रास   

Updated: Jan 7, 2020, 08:24 AM IST
राशीभविष्य ७ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रेमात यश title=

मेष- धन लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय प्राप्त करू शकता. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला जाईल. 

वृषभ- तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडू शकतो. तुमचं मत इतरांना पटेल. कुटुंबाकडून समर्थन आणि मदत मिळेल. लांब असलेल्या व्यक्तिंसोबत चर्चा होईल. जूने वाद मिटण्याची शक्यता आहे.  

मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. प्रतीपथावर वाटचाल कराल. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

कर्क- पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत कराल. सामाजिक कार्यक्रमात उपस्थित रहाल. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. दिवस सामान्य आहे. चांगल्या घटना घडतील. जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील. 

सिंह- सामाजिक कामात यशस्वी राहाल. कठीण परिस्थित कुटुंबाचं आणि मित्र परिवाराकडून मदत मिळेल. वेळ चांगली आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक अडचणी दूर होतील. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. 

कन्या- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत भावनांच्या आधारे जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वादांमध्ये अडकाल. जुने वाद पुन्हा डोकं वर काढतील. कौटुंबीक समस्या वाढतील. वाहनांचा सावधगिरीने वापर करा. 

तुळ- कामं थांबणार नाहीत. तुमच्याकडून लोकांना अधिक अपेक्षा आहेत. दुसऱ्यांच्या गरजांना पूर्ण कराल. आर्थिक परिस्थित सुधारणा होतील. दिवस चांगला आहे.

वृश्चिक ­ व्यवसाय चांगला चालेल. तुमचं एखादं अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम असेल. व्यक्तिगत प्रश्न निकाली निघतील. गुंतवणूकीच्या योजना आखाल. 

धनु- परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. 

मकर- व्यापार आणि नेकरीमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. महत्त्वाच्या विषयावर कुटुंबात चर्चा होईल. ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. काही नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर घ्याव्या लागतील. गुंतवणूक करण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.

कुंभ- जूनं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. दुऱ्यांना मदत केल्याचा आनंद आणि फळ मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामांमध्ये मदत मिळेल. 

मीन- जीवनात काही महत्त्वाचे सकारात्मक बदल घडतील. अडचणी कमी होतील. अनेक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कामाचे प्रमाण जास्त असेल. काही नवीन करण्याची इच्छा आहे. प्रेम प्रकरणात यशस्वी राहाल.