मेष - आजचा दिवस महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट बोलताना सावधनता बाळगा. सध्याचा काळ अडचणीचा आहे, त्यामुळे सावध राहा आणि काळजी घ्या.
वृषभ - व्यावसायिकांनी सावध राहायला पाहिजे. अन्य गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. कामासाठी बाहेर जाऊ शकता.
मिथुन - धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीची काळजी घ्या.
कर्क - योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीत सुधारणा होईल.
सिंह - अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायात सावध राहा. घाई-गडबड करु नका. व्यवसायात अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो.
कन्या - आपल्याला नशिबाची साथ मिळेल. अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. सांभाळून राहा.
तुळ - उत्साह वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वादाची शक्यता आहे. व्यवसायासंबंधी नवीन कल्पना येऊ शकतात.
वृश्चिक - नोकरदारवर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन जबाबदारी मिळू शकते. मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. तब्येतीची काळजी घ्या.
धनु - आज दररोजच्या कामांमधून वेळ काढून काही इतर गोष्टींवरही लक्ष द्या. आनंदी राहा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. उष्णता वाढविणारे पदार्थ खाऊ नका.
मकर - आज जोडीदाराची मदत मिळेल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. व्यापाराच्या नव्या संधी मिळतील.
कुंभ - दिवस चांगला आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत होऊ शकते. चांगले बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता.
मीन - व्यापारात चढ उतार येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे.