मेष : आजचा दिवस सकारात्मकता देईल. आज तुम्हाला स्वतःला तुमच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विचारांच्या संकटात अडकलेले तुम्ही स्वतःच आज मार्ग काढाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अविवाहित व्यक्ती आज लग्नाचा ठाम निर्णय घेऊ शकते.
वृषभ : मित्र परिवाराची मदत मिळेल. समोरची व्यक्ती काय सांगतेय, हे आज ऐकून घ्या. जवळच्या व्यक्तींचे मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे. निर्णय घेताना खूप काळजीपूर्वक विचार करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन : समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करा. स्वतःचे आपले विचार असतात पण मोठ्यांच ऐका. आज थोडी तब्बेत नरम असेल. जुनी दुखणी डोकी वर काढतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सर्वांना संभाळून घ्यावे लागेल.
कर्क : लोकं काय म्हणतात याचा विचार न करता स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रत्येकवेळी योग्य असू शकत नाही. त्यामुळे थोडं शांतपणे घ्या. नवीन काही तरी शिकण्याकडे तुमचा कल असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. दिवस आनंदात जाईल.
सिंह : जरी तुम्ही कमी बोलत असलात तरी आज तुमचं मत महत्वाचं आणि ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे अगदी जबाबदारीने निर्णय घ्या. कुटुंबात आज तुमचा खूप मोठा आधार असेल. जवळच्या व्यक्तीसोबत खटके उडतील. योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या.
कन्या : प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. आज जवळच्या व्यक्तींकडून राजकारण होत असल्याचं पाहायला मिळेल. यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे शांत राहा. नोकरी किंवा व्यवसायाकडे अधिक लक्ष द्या.
तूळ : आज नात्यांमध्ये थोडा गोंधळ पाहायला मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींना आज मानसिक आधाराची गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस खास आहे. अचानक पार्टीचा प्लान होऊ शकतो.
वृश्चिक : स्वतःला दोष देऊ नका. काही गोष्टी अनावधानाने घडतात. आजचा दिवस थोडा चिंतनाचा आहे. भूतकाळातील गोष्टींचा विचार करा. भविष्यातील गोष्टींसाठी सज्ज व्हाल. सकारात्मक विचार अनेक पर्याय खुले करु शकतो.
धनू : आज जवळच्या व्यक्तींकडून दुखावले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडं शांत राहणंच योग्य आहे. कामात चांगल यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीमध्ये पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर : जुन्या जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. खूप दिवसांनी तुम्हाला अतिशय फ्रेश वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आजचा दिवस खास असेल.
कुंभ : आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असेल. मात्र तुम्ही या दिवसाला खास बनवू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदाराची साथ किती महत्वाची आहे याची आज जाणीव होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन : मीन राशीसाठी आजचा दिवस खास असेल. सकारात्मक विचारांनी भरलेला आजचा दिवस असेल. भूतकाळातील अनुभवावरून भविष्याकडे वाटचाल कराल. काम प्रेमाने करा. सगळ्यांचा आदर राखा याची चांगली बाजू तुम्हाला अनुभवता येईल.