Horoscope 16 September : दिवसाची सुरुवात तर झालीये, पण तरीही कामांची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आज तुमच्या राशीत नेमकं काय लिहिलंय...
मेष- नोकरीच्या ठिकाणी इतरांशी सामंजस्यानं वागा. लगानसहान गोष्टींवर वाद घालू नका. तरुणांनी पैसे बेतानं वापरा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ- आर्थिक कामं मार्गी लागणार आहेत. कागदोपत्री व्यवहारांमध्ये असणारा गोंधळ अखेर संपेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांत सहभागी व्हा.
मिथुन- आज मन अशांत असेल. पण, एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलणार आहे. अचानकच सकारात्मक उर्जेची ताकद तुम्हाला जाणवेल.
कर्क- आज तुमच्यावर स्वत:च्याच कामाचा प्रभाव असणार आहे. पण, मी पणा बाजूला ठेवून इतरांची मदत करा. पुढे याच वृत्तीचा फायदा होणार आहे.
सिंह- नोकरीच्या ठिकाणी आज कुटुंबासारखं वातावरण असणार आहे. लहान मुलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज काहीतरी नवं शिकण्यास मिळणार आहे.
कन्या- नोकरीच्या मुद्द्यावरून अडचणीत असाल तर आज तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
तुळ- एखाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत.
वृश्चिक- आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार राहा. आरोग्य उत्तम असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळणार आहेत.
धनु- आज तुम्ही मनात धराल ती इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांसाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामाचा बोजा वाढेल.
मकर- नोकरीच्या ठिकाणी आज फायद्याचा दिवस आहे. एकाग्रता ठेवा, तुमच्या जिद्दीच्या बळावर आज मोठं होण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र आहे.
कुंभ- नोकरीच्या ठिकाणी आजचं वातावरण उत्साही असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्ग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर पुढे जाणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाखात एक असणार आहे.
मीन- प्रत्येक काम शांततेनं मार्ग लावा. आरोग्याची काळजी घ्या. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.