मेष- नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आज खूप सारं काम करावं लागू शकतं. पण, घाबरून जाऊ नका. नवं घर खरेदी करण्याचा विचार करु शकता. धार्मिक यात्रांचा योग आहे. आरोग्य सुधारेल.
वृषभ- व्यवसाय सुरळीत सुरु राहिल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमिनीच्या बाबतीत फायदा होण्याची चिन्हं आहेत. कर्ज फेडण्यासाठी मार्ग मिळतील. वडिलांची मदत मिळेल.
मिथुन- अनेक विचारांमुळे कामात मन रमणार नाही. काही खास गोष्टींविषयी विचार करावा लागू शकतो. कामात एकाग्रता नसल्यामुळे अडचणी वाढतील. खर्चाचं प्रमाण वाढेल.
कर्क- नशीबाची साथ आहे. एखाद्या कामात उलटफेर होण्याची शक्यता आहे. नवं काम सुरु करण्यासाठी आडचा दिवस चांगला आहे. अनेक कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल.
सिंह- कामाच्या ठिकाणी शत्रूवर मात करु शकता. नवं काम मिळण्याची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक बाबतीत जास्त विचार कराल.
कन्या- कामाच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल. प्रगतीची संधी आहे.
तुळ- आरोग्याची काळजी घ्या. साथीदारावर संताप व्यक्त कराल. बोलण्यावर ताबा ठेवा. स्वत:वरही नियंत्रण ठेवा. थकवा जाणवेल. आराम करा. ही वेळ तुमच्यासाठी चांगला नाही.
वृश्चिक- अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. दैनंदिन कामांतून धनलाभ होऊ शकतो. आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या.
धनू- कनिष्ठांची मदत मिळेल. व्यापारात नव्या अडचणी समोर येतील. एक नवी सुरुवात करण्याची संधी आहे. साथीदाराला आनंदित करण्यासाठी कागी खर्च करु शकता.
मकर- व्यापाराच्या दृष्टीने एखादा लहानसा प्रवासही फायद्याचा ठरेल. नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नोकरीत प्रगती करण्याची संधी आहे.
कुंभ- नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. जुन्या मित्रांची मदत होईल. मन प्रसन्न असेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- काम करण्याच्या पद्धतीत काही बदल घडतील. नोकरी आणि व्यवसायात मन रमेल. मतभेद होतील. काही व्यक्ती तुमच्या मेहनतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील.