Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये तीन ग्रहांचं मिलन झालं आहे. यातून विनाशकारी विस्फोट योग तयार झाला आहे. हा अशुभ योग तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 18, 2023, 06:11 PM IST
Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या  title=
Tirgrahi Yog made in tula Conjunction of 3 planets creates Destructive Eruption Yoga These zodiac sign people have health problems along with loss of wealth

Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या ग्रहांचा राजा सूर्य देवाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तूळ राशीत मंगळ, केतू आणि आता सूर्यदेव यांचं मिलन झालं आहे. तूळ राशीत या त्रिग्रह योग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. मंगळ, केतू आणि सूर्य यातून अतिशय विनाशकारी स्फोटक योग निर्माण झाला आहे. सूर्यदेवाच्या त्रासामुळे तीन राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. या लोकांना आर्थिक हानीसोबत आरोग्याची समस्या उद्भवणार आहे. खालील राशींना राहवं लागणार आहे सावधान (Tirgrahi Yog made in tula Conjunction of 3 planets creates Destructive Eruption Yoga These zodiac sign people have health problems along with loss of wealth)

'या' राशींनी राहावं सावधान !

मेष (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांना अत्यंत विध्वंसक स्फोटक योगामुळे अनेक समस्या ग्रासणार आहेत. या लोकांच्या सप्तम भावात या विनाशकारी योग तयार झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम यांच्या आयुष्यावर पडणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराला हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. तर अपघातात दुखापत होण्याची भीती आहे. या काळात आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. या अशुभ योगात नवीन कामाला सुरुवात करु नका. 

तूळ (Libra Zodiac)

तूळ राशीतच त्रिग्रह योगामुळे निर्माण झालेला विनाशकारी योग अतिशय घातक ठरणार आहे. त्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात या योगामुळे वादळ येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होणार आहे. भागीदारीच्या कामात मोठं नुकसान होण्याचे संकेत आहे. तुमच्या महत्त्वाचं कामं या काळात टाळा. आयुष्यात काही तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात वाहन चालवतानाही विशेष काळजी घ्या. अपघाताचे योग निर्माण झाले असल्याने ही काळजी आवश्यक आहे. 

हेसुद्धा वाचा - Horoscope 2024 : नववर्ष 2024 मध्ये 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

मिथुन (Gemini Zodiac)

हा विध्वंसक स्फोटक योग मिथुन राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. हा योग तुमच्या कुंडलीत पाचव्या घरात तयार झाला आहे. त्यामुळे मुलांकडून तुम्हाला अधिक त्रास होण्याची दाट शक्यता आहे. ज्या महिला गरोदर आहेत त्यांना गर्भपात होण्याची भीती आहे किंवा ऑपरेशनद्वारे मूल होऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञाने सांगितलं आहे. या ऑपरेशनमध्ये मुलाला दुखापत होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये चढ उतार पाहायला मिळले. आर्थिक व्यवहार या काळात टाळा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)