तुळशी जवळ चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी, घरातील सदस्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम

ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जाणून घ्या शास्त्रानुसार तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत.

Updated: Mar 23, 2022, 09:16 PM IST
तुळशी जवळ चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी, घरातील सदस्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम title=

Tulsi Tree : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीत लक्ष्मी देवी वास करते अशी मान्यता आहे. यामुळेच लोक आपल्या घरात तुळशीचं रोप लावतात. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहते तेथे सुख, शांती आणि समृद्धी असते. पण शास्त्रानुसार कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी तुळशीभोवती काही वस्तू ठेवू नये.

कोणत्या वस्तू ठेवू नयेत

ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जर तुळशी सुकत असेल किंवा कोमेजत असेल तर ते अशुद्धतेमुळे असू शकते. अशा परिस्थितीत दररोज तुळशीभोवती स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

तुळशीच्या आजूबाजूला केर, पादुका, झाडू किंवा कचरा नसावा. याशिवाय इतर फुले व पाने तुळशी सोबत लावू नयेत. ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते तेथे दुसरे रोप लावणे योग्य मानले जात नाही. तुळशीमध्ये दुधात पाणी मिसळून अर्पण केल्याने तुळशी हिरवी राहते.

अनेकवेळा लोक संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना जल अर्पण करतात. संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करणे शुभ मानले जात नाही. याशिवाय तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीजवळ फक्त पेटलेला दिवा ठेवावा. विझल्यानंतर तो तेथून काढून टाकावा, कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते.

घरांमध्ये तुळशीला चुनरीने झाकून ठेवले जाते. अशा स्थितीत हे लक्षात ठेवावे की जेव्हा चुनरी जुनी होईल किंवा फाटेल तेव्हा ती एकादशी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर बदलावी.

अनेकदा महिला आंघोळीनंतर उघड्या केसांनी तुळशीला पाणी देतात. तुळशीला सदैव आनंदी राहण्यासाठी देवाकडून वरदान मिळाले आहे. त्यामुळे केसांना बांधून आणि सिंदूर लावून तुळशीला पाणी अर्पण करावे.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)