Budh Surya Yuti : सूर्य वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये सूर्य ग्रह हा सर्वात महत्त्वाचा आहे. सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य हा आदर, उच्च स्थान आणि नेतृत्त्वाचा कारक मानला जातो. तर बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. लवकर राजा आणि राजकुमार यांचा संयोग होणार आहे. त्यामुळे दोन खास योग जुळून आले आहेत. कुंडलीतील या दोन विशेष योगामुळे काही राशींच्या आयुष्यात राजयोग येणार आहे. 8 जुलै 2023 ला बुध ग्रह रात्री 12.19 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. आता सूर्य गोचरमुळे (Surya Gochar 2023) कर्क राशीत बुध आणि सूर्यदेवाची भेट होणार आहे. सूर्यदेव 17 जुलै 2023 ला पहाटे 5.19 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. पुढील एक महिना सूर्यदेव कर्क राशीत राहणार आहे.
सूर्य गोचरमुळे कर्क राशीत जेव्हा बुध आणि सूर्य यांची भेट होणार आहे तेव्हा दोन शुभ राजयोग जुळून आले आहेत. बुधादित्य आणि विपरीत राजयोग यांची निर्मिती होणार आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्यात भाग्य उदय होणार आहे. (surya in kark Budh Surya Yuti Mercury Sun Conjunction creates Budhaditya Raja Yoga and vipreet rajyog 16 july surya gochar 2023) जाणून घ्या तुमची रास यात आहे का?
मकर राशीच्या कुंडलीत विपरीत राजयोग तयार होतं आहे. हा विपरीत राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कोर्टकचेरीच्या गोष्टी मार्गी लागणार असून त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली झाल्यामुळे जुन्या कर्जाची तुम्ही परतफेड करु शकणार आहात. आरोग्यात सुधार होणार आहे. छुप्या शत्रूंवर मात करण्यात यशस्वी होणार आहात.
कर्क राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग वरदान ठरणार आहे. परदेशाशी संबंधित बिझनेसमधून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. बँकिंग, गुंतवणूक, आयात-निर्यात या क्षेत्राशी संबंधित लोकांना विपरीत राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. सूर्य गोचरमुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तर कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग शुभकाळ घेऊन आला आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. जुन्या आजाराच्या त्रासातून तुमची मुक्तता होईल. नोकरी आणि व्यवसायातून अचानक धनलाभाचे योग आहेत. या काळात तुमची आध्यात्मक रुची वाढणार आहे. सूर्य गोचरमुळे या राशीच्या कुंडलीत विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे संशोधन किंवा अन्वेषणाशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे.