Surya Gochar : सूर्य देव वाढवणार 'या' राशींचं टेन्शन; पुढचा एक महिना असणार आव्हानात्मक

Sun Transit In Libra: येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 14, 2023, 08:05 AM IST
Surya Gochar : सूर्य देव वाढवणार 'या' राशींचं टेन्शन; पुढचा एक महिना असणार आव्हानात्मक title=

Sun Transit In Libra: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सूर्य देव कोणत्याही राशीमध्ये सुमारे 30 दिवस राहताता. यानंतर ते दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. 

18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे गोचर काही राशीच्या लोकांसाठी खूप नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना 

मेष रास 

तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरचा प्रभाव मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार नाही. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते. तुम्हाला अचानक व्यवसायाशी संबंधित सहलीला जावे लागेल, जो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. सुख-समृद्धी कमी होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील समस्यांमुळे तुम्हाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. 

मिथुन रास

मिथुन राशीसाठी हे गोचर धोकादायक ठरणार आहे. तुमच्या सर्व कामात वारंवार अडथळे निर्माण होतील. तुमच्या मनात अस्वस्थतेची भावना निर्माण होईल. सूर्य गोचरच्या काळात तुम्ही तुमचे करिअर अत्यंत काळजीपूर्वक निवडावं. पैशाचा अपव्यय होऊ शकतो. नोकरी बदलण्यासारखे विचार तुमच्या मनात येतील, परंतु सध्या तुम्ही कोणत्याही प्रकारचा बदल करणे टाळावे. 

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना सूर्याच्या राशी बदलामुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो. तूळ राशीत सूर्याच्या गोचरच्या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्यावरील कामाचा ताणही खूप वाढू शकतो. सहकाऱ्यांकडूनही तुमच्या अडचणी वाढू शकतात. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी देखील हे गोचर चांगलं होणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होणार नाही. कामाचा ताण वाढणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात व्यवसाय करणाऱ्यांचंही मोठे नुकसान होणार आहे. प्रतिस्पर्ध्यांकडूनही कडवी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होण्याची शक्या आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर परिणामकारक ठरणार नाही. तुम्ही केलेले सर्व कष्ट व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर राहणार नाही. चांगले पैसे मिळवण्यातही तुम्ही मागे राहू शकता. या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुमचे खर्च झपाट्याने वाढू शकतात. या काळात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )