Budhaditya Rajyog In Sagittarius: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध एकत्र धनु राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. हा योग 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. बुधादित्य राजयोग व्यक्तीला मोठे यश, संपत्ती, आदर आणि सर्व काही देतो.
डिसेंबर 2022 मध्ये, बुधादित्य राजयोग सूर्य गोचर आणि बुध संक्रमणामुळे तयार होत आहे. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल. यावेळी सूर्य आणि बुध दोघेही धनु राशीत असून त्यांचा एकत्रितपणे बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे, हे जाणारे वर्ष या 3 राशीच्या लोकांना खूप काही देईल आणि 2023 वर्षांची सुरुवात छान करेल. जाणून घ्या बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.
वृषभ : बुध आणि सूर्य यांच्या गोचरमुळे तयार झालेला बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येईल. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. नोकरी बदलण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आरोग्य सुधारेल ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा येईल. तुमचे वर्चस्व वाढेल.
मिथुन : हा बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. विशेषत: कौटुंबिक जीवनासाठी हा काळ खूप आनंदाचा असेल. लाइफ पार्टनर किंवा लव्ह पार्टनर पेक्षा चांगला असेल. आयुष्यात प्रेम-रोमान्स वाढीला लागेल. अविवाहित लोकांचे विवाह जमण्यास मदत होईल. करिअरसाठीही वेळ योग्य राहील. तुमचा प्रवास चांगला होणार आहे. तो फायदेशीर ठरेल.
कुंभ : बुध आणि सूर्य गोचरने बुधादित्य राजयोग आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पन्न वाढेल. उत्पन्नात वाढ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुने कर्ज फेडू शकाल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. तुमच्याबद्दल आदर वाढेल. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)