Surya Dev Arghya | नियमित सूर्य देवाला अर्घ्य दिल्यास होते भरभराट; करिअरमध्येही प्रगती

Surya Dev Daily Arghya Rules: सूर्यदेव ही अशी देवता आहे, जी आजही भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतात. अशा वेळी सूर्यदेवाची नित्य उपासना केल्याने भक्तांना मान-सन्मान, प्रतिष्ठा, करिअर आणि प्रत्येक कामात यश मिळते. 

Updated: Jun 14, 2022, 07:47 AM IST
Surya Dev Arghya | नियमित सूर्य देवाला अर्घ्य दिल्यास होते भरभराट; करिअरमध्येही प्रगती title=

Surya Dev Daily Arghya Rules: सूर्यदेव ही अशी देवता आहे, जी आजही भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतात. अशा वेळी सूर्यदेवाची नित्य उपासना केल्याने भक्तांना मान-सन्मान, प्रतिष्ठा, करिअर आणि प्रत्येक कामात यश मिळते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना पाण्यासोबत काही गोष्टींचा समावेश करावा. पूर्ण अर्घ्य तुम्हाला जीवनातील प्रत्येक यश मिळवून देईल.

अक्षता- अक्षता म्हणजे संपूर्ण तांदूळ. हिंदू धर्मात अक्षत हे अत्यंत पवित्र धान्य मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना त्यात थोडेसे अक्षता टाकल्याने घरात सुख-शांती राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.

लाल फूल- हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा फुलांशिवाय अपूर्ण मानली जाते. पौराणिक ग्रंथानुसार सुवासिक फुले देवी-देवतांना अतिशय प्रिय असतात. पूजेच्या वेळी देवतांना लाल फूल अर्पण केल्यास देवता प्रसन्न होतात. सूर्यदेवाला लाल रंगाची फुले किंवा गुल्हादाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतात.

खडी साखर- सूर्यदेवाची कृपा कायम ठेवण्यासाठी आणि प्रत्येक कार्यात यश मिळविण्यासाठी पाण्यात साखर टाकून अर्घ्य द्यावे, असे मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात मान-सन्मान आणि यश मिळतो आणि प्रगती होते.

कुंकू- कुंकूचे ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. सर्व देवतांच्या पूजेच्या वेळी डोक्यावर कुंकूचा टिळा लावला जातो. तसेच पाण्यात कुंकू मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपण निरोगी राहतो.

हळद- हळदीचा वापर अनेक धार्मिक विधींमध्ये केला जातो. हळद देखील पवित्र मानली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना त्यात हळद मिसळल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, असे म्हणतात. तसेच सूर्यदेवाच्या कृपेने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.