मुंबई : आनंदी आयुष्य प्रत्येकाला हवं असतं. पण जीवनात चांगले दिवस आणि वाईट दिवस कायम येत-जात राहतात. त्यामुळे चांगल्या दिवसांत वाईट दिवसांची आठवण येते आणि वाईट दिवसांत चांगल्या दिवसांची. ज्याप्रकारे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचं प्रकारे जीवनाला देखील दोन बाजू असतात. मात्र दु:खाच्या वेळी संयम बाळगायला हवा... आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणातून संयम बाळगण्याची शिकवण दिली आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती शास्त्रामध्ये त्यांचे जीवन अनुभव सांगितले आहेत.
1. आचार्य चाणक्य म्हणतात की, जो कष्ट करतो.. मेहनत करतो.. अशाचं व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा असते. जे कष्ट करतात आणि जीवनात संयम ठेवून काम करतात, त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. अशा व्यक्तींच्या गुणांमुळे लोक त्यांच्यावर खूप खुश असतात.
2. नीती शास्त्रमध्ये असे सांगण्यात आले आहे की मेहनती लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि कठोर परिश्रमाने कमावलेले पैसे देखील आनंद आणि समृद्धी आणतात. कष्टकरी लोकांना समाजात यश मिळते आणि हे लोक जीवनात नेहमीच यशस्वी होतात.
3. आचार्य चाणक्य म्हणतात की पैसा वाचवण्याची गुणवत्ता प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते. प्रत्येक व्यक्तीने आपले पैसे खूप विचारपूर्वक खर्च केले पाहिजेत जेणेकरून पुढील आर्थिक समस्या टाळता येतील, पैशाची बचत करण्याचे छोटे उपाय देखील तुम्हाला मोठे फायदे देऊ शकतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)