Mercury-Venus Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती झाल्यानंतर खास राजयोग तयार होतात. दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. येत्या काळात शुक्र ग्रह आणि बुध ग्रह यांची युती होणार आहे.
शुक्र ग्रह हा वैभव, विलास आणि सुखाचा कारक मानला जातो. याशिवाय बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्राचा कारक आहे. आगामी काळात सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या लक्ष्मी नारायण योग तयार होतोय, यावेळी या संयोगाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. हा राजयोग कोणत्या राशींसाठी सकारात्मक परिणाम असणार आहे, ते पाहुयात.
सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याचसोबत व्यक्तिमत्वही आकर्षक होणार आहे. तुमचे रखडलेले काम या काळात पूर्ण होईल. लाइफ पार्टनरशी संबंधही चांगले राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे उत्पन्नही सुधारेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस आणि समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग खूप फलदायी ठरणार आहे. बुध ग्रह आणि शुक्राची कुंडलीतील कर्माच्या घरात हा योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात फायदा होणार आहे. कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाणार आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना या काळात आर्थिक लाभ होईल. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असल्यास ते करू शकता.
धनु राशीच्या लोकांनाही लक्ष्मी नारायण राजयोगाचा खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात भाग्य तुम्हाला साथ देईल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. या काळात घरात काही शुभ कार्य देखील होणार आहेत. या काळात कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. रखडलेली सर्व कामं यावेळी मार्गी लागणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )