Shri Ram Mantra:श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत . रामायणात श्रीरामांना मर्यादा पुरोषत्तम असं म्हटलं जातं. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सर्व गुण संपन्न आणि उत्तम नेतृत्व करणारा राजा अशी श्रीरामांची ओळख आहे. प्रभू श्रीरामांच्या नावात खूप सकारात्मक उर्जा आहे. श्रीरामांचे श्रीरामरक्षा स्तोत्र नियमित पठण करणं लाभदायक आहे. राम रक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे.राम रक्षा स्तोत्र हे भक्ती योग आणि संपूर्ण मानवी शरीर आणि मानवी शरीराच्या प्रत्येक अवयव अंगप्रत्यंग यावर लक्ष एकाग्र करायला मदत करते. विद्यार्थ्यांनी रामरक्षा स्तोत्र दररोज वाचल्याने त्यांची अभ्यासात प्रगती होते. ज्या घरी दररोज श्री रामरक्षा स्तोत्र आणि रामनामाचा जप असतो, त्या वास्तुमध्ये सकारात्मकता असते. सद्गुरू रामदास स्वामींनी रामरक्षा स्तोत्र लिहीले आहे. त्यांनी आपलं सर्व बळ वापरून ह्या स्तोत्राचं लिखाण केलं आहे, असं म्हटलं जातं, मारूतीची शक्ती जणू ह्या लिखाणात आहे.
विद्यार्थ्यांनी रामरक्षा म्हणल्यानं त्यांची एकाग्र शक्ती वाढते , उच्चार स्पष्ट होतात. याबरोबरचं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
सर्वार्थसिद्धि श्री राम ध्यान मंत्र
ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम,
लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम !
श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः !
रोज या मंत्राचा जप केल्यानं सर्व मनोकामना पुर्ण होतात.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।।
हे स्तोत्र म्हणल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात.
हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा।
गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा॥
हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते।
बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्॥
प्रभू श्रीरामाच्या या मंत्रांचा दररोज जप केल्यास श्रीरामाचा आशीर्वाद कायम राहतो. जो व्यक्ती फक्त राम नामाचा जप करीत असेल तरीही तोआयुष्यात सकारात्मक राहतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)