कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज?

 लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पोराला पोरगी किंवा पोरीला पोरगा पसंत की लग्नाची तयारी सुरु होते. पण आपल्याकडे असंख्य लोक असे आहेत जे जन्म कुंडली जुळल्याशिवाय लग्नासाठी परवानगी देत नाही. मग अशावेळी तुम्हाला आवडत्या जोडीदारासोबत लग्न करायचं आहे पण कुंडली जुळली नाही तर लग्न करावं की नाही?  

नेहा चौधरी | Updated: Jan 9, 2024, 08:38 PM IST
कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज? title=
Should you get married even if your janma kundali or horoscope doesnt match What does Premanand Maharaj say

हिंदू धर्मात जन्म कुंडलीला अतिशय महत्त्व आहे. ही जन्म कुंडली तुमचं भवितव्याचे संकेत देते. आजही असंख्य लोक आहेत जे कुंडलीवर विश्वास ठेवतात. हिंदू धर्मात मुलगा मुलगी म्हणजे वर वधूची कुंडली जुळल्याशिवाय लग्नाला परवानगी देत नाही. लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पालक त्या जोडप्याची कुंडली जुळतात. ज्योतिषशास्त्रानुसार वर वधूचे लग्न करण्यासाठी किती गुण जुळतात हे पत्रिकेवरुन पाहिले जातात. पत्रिकेत 36 गुणपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. मात्र तुमचे गुण जुळत नसेल तर पालक त्या जोडप्याला लग्नासाठी नकार देतात. साधारण पणे वधू आणि वराचे 18 किंवा त्यापेक्षा अधिक गुण जुळले पाहिजे. त्यापेक्षा खाली असल्यास ते जोडप लग्नानंतर सुखी राहू शकतं नाही असं म्हणतात. या जगात कुंडली मानणारे आणि न मानणारे अशी दोन्ही लोकं सापडतात. 

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का?

तुम्हाला जर लग्न करायचं आहे आणि तुमची कुंडली जुळत नाही अशावेळी लग्न करावे का? असा प्रश्न सतावत असेल तर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी तुमच्या या प्रश्नाच निरासन केलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. स्वामी प्रेमानंद महाराज हे वृंदावनात असतात आणि सत्संगातून ते लोकांच्या समस्यांवर उत्तर देतात. त्याचे प्रवचने देश विदेशात प्रसिद्ध आहे. अशाच एका सत्संगाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांच लक्षवेधून घेत आहे. त्यांना एका भक्ताने विचारलं की, मुलगा आणि मुलगी यांच्यात प्रेमसंबंध आहेत आणि त्यांना लग्न करायचं आहे, पण कुंडली जुळत नाही, तर अशा परिस्थितीत त्या दोघांनी लग्न करावं का? 

काय म्हणतात प्रेमानंद महाराज?

भक्ताच्या प्रश्नाला उत्तर देत प्रेमानंद महाराज म्हणाले की, ''जर कोणाची कुंडली जुळत नाही म्हणजे त्या व्यक्तीचे गुण जुळत नाही, तर कुंडली देवाला अर्पण करून त्या जोडप्याने लग्न करावं. कारण जेव्हा तुम्ही मध्यभागी देवाला साक्ष देता तेव्हा विरुद्ध दिशेला बसलेले ग्रहही शुभ फळ तुम्हाला देतात.'' प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, ''दोघांचेही मन जुळणं अतिशय महत्त्वाच आहे. अशा वेळी दोन व्यक्तींची मनं जुळत असतील तर देवाला साक्षी ठेवून लग्न होऊ शकतो. पालकांची संमती आणि परस्पर प्रेम असेल तर लग्न करणे योग्य आहे.''

प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी बडे नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी कायम येत असतात. ज्यामध्ये क्रिकेटर आणि हिरोईन अनुष्का शर्माच्या नावाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भोजपुरी स्टार रवी किशनही आपल्या कुटुंबासह वृंदावनला महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)