घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत या 5 राशींना ग्रहांचं पाठबळ, अडकलेली कामं मार्गी लागणार

पाहा तुमची राशी आहे का यात

Updated: Sep 26, 2022, 06:47 PM IST
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत या 5 राशींना ग्रहांचं पाठबळ, अडकलेली कामं मार्गी लागणार title=

मुंबई : माँ दुर्गाला समर्पित शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यावर्षी शारदीय नवरात्र 26 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान असेल. नवरात्रीत माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्रीमध्ये आदिशक्ती तिच्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. यामध्ये देवीची पूजा करणाऱ्यांच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. यंदा शारदीय नवरात्री पाच राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानली जात आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी.

वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र खूप शुभ राहील. तुमच्या राशीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. थोडा तणाव नक्कीच असेल, परंतु कामाची स्थिती सतत सुधारेल. माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या करिअरच्या समस्या दूर होतील. नोकरीच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. कौटुंबिक वाद टळेतील. 

कन्या- नवरात्रीमध्ये कन्या राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील. पैशाची स्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण येईल. मालमत्ता लाभाचेही चांगले योग आहेत. प्रतिष्ठा वाढेल. आजार आणि अपघातही दूर राहतील. 

वृश्चिक- शारदीय नवरात्रीमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरच्या आघाडीवर यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. नोकरी, व्यवसायात लाभाची स्थिती राहील. कुटुंबाच्या पाठिंब्याने धनलाभ होईल. प्रॉपर्टीच्या कामात व्यस्त राहाल, परंतु अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. (shardiya navratri 2022 will be lucky for this 5 zodiac signs )

मकर- शारदीय नवरात्रीची सुरुवात होताच मकर राशीचे दिवस बदलतील. करिअर आणि कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आर्थिक स्थितीही चांगली राहील. बँक बॅलन्स वाढेल. 

कुंभ- शारदीय नवरात्री येताच कुंभ राशीच्या लोकांना तणावातून आराम मिळेल. कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत थोडे व्यस्त असाल, परंतु तुम्हाला अपेक्षित परिणाम आणि लाभ मिळतील. धन आणि मालमत्तेशी संबंधित लाभ होतील. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)