Navratri 2022 : नवरात्रोत्सवाच्या पावन दिवसांमध्ये अजिबात नका करू 'ही' घोडचूक; नाहीतर होईल देवीची अवकृपा

Navratri 2022 :  काय करावं हे तर सगळे सांगतात, काय करु नये हे आधी जाणून घ्या...

Updated: Sep 26, 2022, 07:00 AM IST
Navratri 2022 : नवरात्रोत्सवाच्या पावन दिवसांमध्ये अजिबात नका करू 'ही' घोडचूक; नाहीतर होईल देवीची अवकृपा  title=
shardiya navratri 2022 Avoid these things and mistakes

Shardiya Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसापासून पुढचे 9 दिवस सर्वजण देवीच्या विविध रुपांची आराधना करणार आहेत. अशा या मंगलपर्वात दर दिवशी देवीच्या एक-एका रुपाची पूजा बांधली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचं आगमन गज म्हणजेच हत्तीवरून होत आहे, थोडक्यात देवीचं वाहन हत्ती आहे. अगणित आशीर्वाद आणि प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असणाऱ्या या मंगलमय दिवसांदरम्यान, आपण अनेक अशा गोष्टी ज्यामुळं देवी प्रसन्न होईल. पण, यादरम्यान नेमकं काय करू नये हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. (shardiya navratri 2022 Avoid these things and mistakes)

Navratri 2022 : आज घरोघरी घटस्थापना, मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

 

नवरात्रोत्सवादरम्यान 'या' गोष्टी टाळा... 
- नवरात्रीचे 9 दिवस तुमचा उपवास असेल आणि घरात घटस्थापना (Ghatasthapana 2022) होत असेल, तर अखंड ज्योतीवर लक्ष ठेवा. घर रिकामं ठेवू नका. घरात किमान एक व्यक्तीतरी असेल याची काळजी घ्या. 

- घटस्थापना करण्याचा अर्थच असा होतो, की तुम्ही देवीचं आवाहन करत आहात. त्यामुळं सकाळ- संध्याकाळ दोन्ही वेळे विधीवत पूजाअर्चा करा. सात्विक अन्नपदार्थांचा प्रसाद देवीला दाखवा. सात्विक आहार न करण्याची चूक करू नका. 

- घटस्थापना असणारं ठिकाण स्वच्छ ठेवा. तिथं कोणताही कचरा, दुर्गंधी पसरणार नाही याची काळजी घ्या. नवरात्रोत्सवादरम्यान कांदा- लसुणाच्या पदार्थांना दूर करा. 

- नवरात्रोत्सवादरम्यान (Hairs, Nails) केस, नखं कापू नका, दाढी करू नका. पूजेदरम्यान चामड्यापासून तयार करण्यात आलेली कोणतीही वस्तू वापरू नका. 9 दिवसांसाठी काळे कपडे, चामड्याच्या वस्तू, चपला, पर्स, बेल्ट वापरणं टाळा. 

- नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत भान हरपू देऊ नका. चुकीची कामं करु नका, नशेच्या पदार्थांपासून दूर राहा. 

- नवरात्रोत्सव आणि संपूर्ण आयुष्यभर दुसऱ्याविषयी वाईट चितणं टाळा. नकारात्मक विचार दूर ठेवा. कोणत्याही महिला आणि कुमारिकेचा अपमान करु नका. ही घोडचूक ठरेल... 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)