Kendra Trikon/Shash rajyog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रह, राजयोग आणि नक्षत्रांना अत्यंत महत्त्व देण्यात येतं. प्रत्येक ग्रह एक राशी सोडून एका विशिष्ट वेळी दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यामुळे ग्रहांचा संयोग तयार होऊन अनेक प्रकारचे शुभ-अशुभ योग तयार होतात.
ग्रहांमध्ये न्यायदेवता शनी याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या शनिदेव कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. त्यांच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. तर नोव्हेंबर 2023 मध्ये, शनी मार्गी होणार असून त्यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या दोन्ही राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून येणार आहे, ते पाहूयात.
या राशींवर शनीदेवांची राहणार कृपा
शनि मार्गी असल्यामुळे शश राजयोगाची निर्मिती या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. यामुळे आर्थिक लाभ आणि कामात यश मिळणार आहे. भागीदारीची कामं करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. नोकरीसाठीही वेळ शुभ राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तर केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मान-प्रतिष्ठा मिळेल. बौद्धिक क्षमताही विकसित होईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे.
शनि मार्गी असल्यामुळे शश राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसंच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायासाठी काळ शुभ राहील. नोकरदारांसाठी वेळ नवीन संधी घेऊन येईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्रिकोण राजयोगामुळे उत्पन्नात वाढ, करिअरमध्ये वाढ आणि व्यवसायात अफाट संपत्ती मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मान-सन्मानात वाढ होईल.
केंद्र त्रिकोणी राजयोग स्थानिकांसाठी अनुकूल ठरू शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहणार आहे. जर तुम्ही नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्येही नफा मिळण्याची शक्यता आहे.
शनीच्या मार्गी हालचालीमुळे तयार झालेला शश राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात पती-पत्नीचे नातं अधिक घट्ट होईल. कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन स्रोत उघडतील. अविवाहितांसाठी काळ शुभ संधी घेऊन येईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )