Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता येईल याची माहिती सांगणार आहोत.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बाजारात सहज उपलब्ध होतात त्या स्वस्तदेखील असतात. मात्र या मूर्तीचे विघटन होत नाही. त्यामुळं मुर्तीची विडंबन आणि पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळं शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देत आहेत. यामुळं पर्यावरणाची हानीदेखील होत नाही. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
शाडूची माती, भांडे, लाकडी चौकोनी पट्टी, Carving stics (मूर्ती तयार करण्याची अवजारे), रंगकाम करण्यासाठी ब्रश, नैसर्गिक रंग, फेव्हिकॉल,
शाडूची माती ही बाजारात हल्ली सहज उपलब्ध होते. तुम्हाला किती मोठी मूर्ती घडवायची आहे. त्यानुसार तुम्ही किलोनुसार शाडूची माती विकत घेऊ शकतात. त्याचबरोबर, शक्यतो मूर्तीचा रंग देताना नैसर्गिक रंगच वापरा. हळद, मुलतानी माती, कुंकू, गुलाल याचा वापर करुन रंग तयार करता येतील. त्याचबरोबर रंगात फेव्हिकॉल मिसळल्यास रंग लवकर पक्का होतो.
मूर्ती बनवण्याआधी सर्वात आधी एक चौकोनी लाकडाचा तुकडा घ्या. याच लाकडी तुकड्यावर मूर्ती बनवायला सुरुवात करा. शाडू मातीत कचरा किंवा बारीक खडे असल्यास माती स्वच्छ करा. माती स्वच्छ करुन झाल्यानंतर पाणी टाकून चांगली मळून घ्यावी. माती मळून झाल्यानंतर तुम्हाला मूर्तीची जितकी उंची हवी त्यानुसार गोळे करुन घ्या. त्यानंतर मूर्ती घडवण्यास सुरुवात करा. पायापासून मूर्ती करायला सुरुवात करा. मध्येमध्ये एकदा पाण्याचा हातदेखील लावा जेणेकरुन माती घट्ट बसेल. तसंच, हात, धोतर, मोदक, डोळे यांना आकार देण्यासाठी Carving stics चा वापर करावा.
मूर्तीला आकार दिल्यानंतर ती सुकवण्यासाठी ठेवा. मूर्ती पूर्णपणे सुकल्यानंतर नैसर्गिक रंगाने बाप्पाची मूर्ती रंगवा. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवा. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बाप्पाच्या गळात मोत्याच्या माळा, हार, फेटा वापरून छान सजवू शकतात