Shani Vakri 2022: वैदीक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर राशीत वक्री स्थितीत आहे. 13 जुलैपासून वक्री अवस्थेत असून ही स्थिती 23 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. म्हणजेच जवळपास शनि ग्रह अजून 3 महिने वक्री अवस्थेत असणार आहे. यामुळे धनु, तूळ आणि मिथुन या तीन राशी शनिच्या प्रभावाखाली आल्या आहेत. धनु राशीला साडेसाती, तर तूळ आणि मिथून राशी अडीचकी सहन करत आहेत. शनि अडीचकी आणि साडेसातीत जातकांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागतो. या तीन राशींना 23 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती सहन करावी लागणार आहे. त्यानंतर शनिदेव मार्गस्थ होतील आणि 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करतील. त्यानंतर धनु, तूळ आणि मिथुन राशीला दिलासा मिळेल.
शनिदेव कुंभ आणि मकर राशीचे स्वामी आहे आणि या दोन राशीच्या लोकांवर नेहमी कृपा असते. दुसरीकडे, शनिदेव तूळ राशीमध्ये उच्च आहेत. या लोकांना शनिदेवाच्या कृपेने सर्व सुख-सुविधा आणि मान-सन्मान आणि यश मिळते.असं असलं तरी शनिच्या वक्री स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे.
मेष: शनिची वक्री स्थिती मेष राशीसाठी फलदायी आहे. शनिदेव गोचर कुंडलीतील दशम स्थानात वक्री झाले आहेत. या स्थानाला व्यापार आणि नोकरीचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे या काळात मान सन्मानासह नोकरीचे नवे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या प्रकरणातही यश मिळू शकते.
मीन: गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात शनिदेव वक्री झाले आहेत. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे या काळात उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच व्यापाऱ्यातील काही करार निश्चित होऊ शकतील. दुसरीकडे तुमचा व्यापार किंवा करिअर शनि ग्रहाशी निगडीत असेल तर धनलाभाची शक्यता आहे.
धनु: शनि ग्रह वक्री अवस्थेत असले तर आपल्या दुसऱ्या स्थानात वक्री होत आहे. या स्थानाला धन आणि वाणीचं स्थान म्हटलं जातं. या दरम्यान शेअर मार्केट किंवा लॉटरीतून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. पण धनु राशीवर साडेसातीचा प्रभाव असल्याने वाहन चालवताना सावध पवित्रा घ्या. तसेच मानसिक त्रास होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)