Shani Gochar : 26 महिने 3 राशींना शनिची पीडा! तुम्ही अत्यंत सावध राहा

Shani Gochar 2023 to 2025 Effect: कही राशींच्या वाट्याला शनीची पीडा असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने राजासारखे जीवन मिळते, तर शनीची वाईट नजर चांगल्या आयुष्याची वाट लावते. कुंभ राशीत शनी गोचर होत असल्याने 2023 मध्ये या 3 राशीच्या लोकांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Updated: Dec 11, 2022, 09:51 AM IST
Shani Gochar : 26 महिने 3 राशींना शनिची पीडा! तुम्ही अत्यंत सावध राहा title=

Shanivar Upay and Shani Kavach : काही राशींच्या वाट्याला शनिची पीडा येणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार, शनि ग्रह 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 2025 मध्ये मार्च महिन्यापर्यंत शनी स्वराशी कुंभ राशीत राहील. शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल. शनीचे स्वतःच्या कुंभ राशीत गोचर होत आहे. त्यामुळे साडेसातीचे दिवस काही राशींतून दूर होतील, तर काही राशींतून सुरू होईल. शनीच्या संक्रमणामुळे 2023 ते 2025 हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात कठीण काळ असेल. त्याचवेळी, इतर 2 राशींवर देखील शनिची कृपा असेल. 

या राशींवर शनी गोचरचा नकारात्मक प्रभाव पडेल 

कुंभ : ज्योतिषशास्त्रानुसार शनी प्रत्येक राशीत अडीच वर्षे राहतो. जानेवारीमध्ये शनी कुंभ राशीत प्रवेश करणार असून, यासोबतच कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत क्लेशदायक समजल्या जाणाऱ्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या राशीच्या लोकांना 2025 पर्यंत शनी त्रास देईल, त्यानंतर साडेसातीचा तिसरा चरण सुरु होईल. कुंभ राशीच्या लोकांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी साडेसतीचापासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे, मार्च 2025 पर्यंत, या लोकांनी पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांच्याबाबतीत सावध राहावे. रागावर नियंत्रण आणि व्यवहार जपून करावेत. 

मकर: मकर राशीच्या लोकांसाठी, जानेवारी 2023 मध्ये शनी गोचर होत असल्याने साडेसातीचा तिसरा चरण सुरू होईल. जरी तिसरा टप्पा दुसऱ्यापेक्षा कमी वेदनादायक आहे. असे असले तरी या काळात मकर राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मार्च 2029 नंतर या लोकांचे नशीब बदलेल आणि चांगले दिवस सुरू होतील. 

मीन : मीन राशीच्या लोकांवर साडेसाती काळ ळआहे. शनी गोचर होत असल्याने साडेसाती सुरु होऊन शनीची वाईट नजर त्यांच्यावर राहील. या दरम्यान शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय करावेत. चांगले काम केले पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे. मजूर आणि अधीनस्थांना छळणे टाळले पाहिजे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)