Shani Gochar 2022: शनिदेवांचा अखेर मकर राशीत प्रवेश! चिंता नको हे उपाय करा

आज शनिदेवांनी मकर राशीत प्रवेश केला असून ऑक्टोबरपर्यंत वक्री असणार आहेत.

Updated: Jul 12, 2022, 12:18 PM IST
Shani Gochar 2022: शनिदेवांचा अखेर मकर राशीत प्रवेश! चिंता नको हे उपाय करा  title=

Shani Gochar: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. शनि हा सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे. शनि अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे काही राशी शनिच्या प्रभावाखाली येतात. आज शनिदेवांनी मकर राशीत प्रवेश केला असून ऑक्टोबरपर्यंत वक्री असणार आहेत. जानेवारी 2023 पर्यंत शनिदेव मकर राशीत राहणार आहे. शनिदेवांचा मकर राशीत प्रवेश झाल्याने पाच राशींवर प्रभाव सुरु झाला आहे. धनु राशीच्या जातकांना साडेसाती सुरु झाली आहे. यासोबतच कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनाही साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. याशिवाय मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनि अडीचकी सुरु झाली आहे. दुसरीकडे, कर्क आणि वृश्चिक राशीची अडीचकीपासून सुटका झाली आहे. 

शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा या गोष्टी

  • दर शनिवारी 'ॐ प्रां प्रीं प्रों स: शनैश्चराय नमः' च्या 3 माळा ओढाव्यात. तसेच इतर मंत्रांचा नियमित जप केल्याने फायदा होतो. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते.
  • शनि अमावस्येला सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी विधिपूर्वक पूजा करावी. या काळात शनि चालीसा आणि शनि मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच हनुमान मंदिरात जावे. आणि सुंदरकांडचे पठण करावे.
  • शनिचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी श्रवण नक्षत्रात शमीची अभिमंत्रित मूळ काळ्या धाग्यात धारण करा. तसेच या दिवशी शनिशी संबंधित वस्तू जसे काळे तीळ, काळे जोडे, काळी छत्री, कस्तुरी काळे तीळ, काळी मसूर इत्यादी दान केल्याने शनीचा प्रभाव कमी होतो.
  • शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पाहा. त्यानंतर शनि मंदिरात दान करा. या दिवशी शनि स्तोत्राचे पठण करावे. पक्ष्यांना खायला द्या.
  • शनिचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाची नियमित पूजा करा. पिंपळाच्या झाडाजवळ शनि लघु स्तोत्राचा पाठ करा. यानंतर कच्च्या लस्सीमध्ये काळे तीळ टाकून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि घरात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)